एशिया कप स्पर्धेनंतर भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेची तिकिटविक्रि सुरु झाली आहे.

भारतीय संघाच्या सामन्याची सर्व तिकिटं जवळपास विकली गेली आहेत. सर्वात जास्त मागणी होती ती भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांना. 14 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना रंगणार आहे.

विश्वचषक स्पर्धेसाठी 2 सप्टेंबरला तिकिटविक्री सुरु झाली आणि अपघ्या चार दिवसात संपूर्ण तिकिटं विकली गेली. यात सर्वाधिक महागडी तिकिटं भारत-पाकिस्तान सामन्याची विकली गेली.

ICC आणि BCCI तर्फे तिकिटांची Book My Show वर ऑनलाईन विक्री केली जात आहे. पण तिकिटविक्रीत काळाबाजार केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

वियागोगो या वेबसाईटवर अनधिकृतरित्या तिकिट विक्री केली जात आहे. शेवटच्या दोन तिकिटांसाठी तब्बल 57 लाख 59 हजार रुपयांपर्यंत किंमत पोहोचली.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमच्या महिन्याच्या पगाराशी तिकिटांची तुलना केली जात आहे. पीसीबीबरोबरच्या नव्या करारानुसार बाबर आझमला महिन्याला 43.50 लाख रुपये मिळतात.

वर्ल्ड कप तिकिटं मिळवण्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये जोरदार चढाओढ पाहिला मिळत आहे. केवळ भारत-पाकिस्तान सामन्याचीच नाही तर इतर संघांच्या सामन्याची तिकिटंही वेळ पूर्ण होण्याआधीच विकली गेली.

VIEW ALL

Read Next Story