2 सप्टेंबर रोजी होणार सामना

आशिया चषक 2023 स्पर्धेतील सर्वात हायवोल्टेज सामना हा भारत आणि विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 2 सप्टेंबर रोजी पल्लीकल येथे होणार आहे.

सामन्याआधीच रंगलं युद्ध

या हायप्रोफाईल सामन्यापूर्वीच दोन्ही संघांमध्ये शाब्दिक खेळ सुरू झाला आहे. दोन्ही संघातील खेळाडू याबाबत प्रतिक्रिया देत आहे.

पाकिस्तानच्या हारिस रौफची महत्त्वाची प्रतिक्रिया

त्याचवेळी, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफचा यूट्यूबर मोमीन साकिबसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भारताला दिलं आव्हान

व्हिडीओमध्ये हारिस रौफ म्हणत आहे की, मला भारतीय संघातील सर्व 10 खेळाडूंना बाद करायचे आहे.

हारिस रौफची हास्यास्पद प्रतिक्रिया

हारिस रौफची प्रतिक्रिया ऐकून जवळच उभा असलेल्या यूट्यूबर साकिबलाही हसू अनावर झाले आणि तो जोरजोरात हसायला लागतो.

विराट कोहलीसोबत झाला होता सामना

हा तोच हारिस रौफ आहे, ज्याला विराट कोहलीने 2022 च्या टी-20 विश्वचषकात जबरदस्त धूळ चारली होती.

विराटला विसरणार नाही हरिस रौफ

विराटने हारिसच्या चेंडूवर मारलेला षटकार आजही तमाम क्रिकेट चाहते विसरले नाहीत. हारिफला सुद्धा सोशल मीडियावर लोक याची आठवण करुन देत आहेत.

विराटमुळे मिळाला होता पाकिस्तानविरुद्ध विजय

त्या सामन्यात विराटच्या 53 चेंडूत 82 धावांच्या खेळीमुळे भारताने शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानचा पराभव केला होता. (सर्व फोटो - ट्वीटर)

VIEW ALL

Read Next Story