कसोटी संघात पुन्हा स्थान न मिळाल्याने सरफराज दुखावला; Insta Story Viral

गावसकर यांनीही नाराजी व्यक्त केलेली असतानाच सरफराजने पोस्ट केली इन्स्ता स्टोरी

भारतीय संघाची घोषणा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

पुन्हा एकदा स्थान नाकारलं

या दोन्ही संघांमध्ये सरफराज खानला पुन्हा एकदा स्थान देण्यात आलेलं नाही.

आश्चर्य आणि संताप

घरगुती क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करुनही त्याला डावलण्यात आल्याने चाहत्यांनी आश्चर्य आणि संताप व्यक्त केला आहे.

3 रणजी पर्वांमध्ये 100 च्या सरासरीने धावा

सरफराजने 80 च्या सरासरीने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये धावा केल्यात. त्याने मागील 3 रणजी पर्वांमध्ये 100 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

गावसकर नाराज

सुनील गावसकर यांनीही सरफराजला स्थान न मिळाल्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

अजून काय करायला हवं?

"सरफराज मागील 3 पर्वांमध्ये 100 च्या सरासरीने धावा करतोय. त्याने निवड व्हावी यासाठी अजून काय करायला हवं?" असा प्रश्न गावसकर यांनी विचारला आहे.

किमान टीममध्ये स्थान द्या

"त्याला अंतिम 11 मध्ये खेळवलं नाही तरी त्याला संघात तर स्थान देता येईल. असं केल्याने त्याच्या खेळाकडे लक्ष आहे असा तरी संदेश जाईल," असं गावसकर म्हणाले.

...तर रणजी खेळू नको असं तरी सांगा

"त्याला निवडायचं नसेल तर त्याला किमान रणजी खेळू नकोस असं तरी सांगा. कारण त्याचा तसाही काही उपयोग होत नाहीय," असा टोला गावसकरांनी लगावला आहे.

स्टोरीने अनेकांचं लक्ष्य वेधलं

याच सर्व चर्चे दरम्यान, सरफराजने इन्स्ताग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीने अनेकांचं लक्ष्य वेधून घेतलं आहे.

इन्स्ता स्टोरीमध्ये नेमकं काय?

सरफराजने इन्स्ताग्राम शेअर केलेल्या स्टोरीमध्ये नेट्सचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला त्याने 'वन लव्ह' अशी कॅप्शन दिली आहे.

चित्रपटाचं गाणं वापरलं

या स्टोरीला त्याने 'लक्ष्य' चित्रपटाचं गाणं वापरलं आहे. 'इस लक्ष्य को पाना है' असे या गाण्याचे शब्द आहेत.

VIEW ALL

Read Next Story