खेळ थांबवल्यानंतरही वाढली संपत्ती

सौरव गांगुलीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत भरपूर संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवली, परंतु हा खेळ वेगळा झाल्यानंतरही त्याची संपत्ती कमी झाली नाही उलट वाढतच गेली.

51 वर्षांचा झाला सौरव गांगुली

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांचा आज वाढदिवस आहे. 8 जुलै 1972 रोजी जन्मलेला सौरव गांगुली 51 वर्षांचा झाला आहे.

श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत आजही दादाचं स्थान

निवृत्तीनंतरही गांगुलीच्या संपत्ती आणि प्रसिद्धीमध्ये कोणतीही घट झालेली नाही. तो अजूनही भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे.

10 कोटींचे घर

सौरव गांगुलीने कोलकातामध्ये घराच्या सजावटीवर बराच खर्च केला आहे. त्यांचे घर एखाद्या राजवाड्यासारखे आहे, ज्याची किंमत सुमारे 10 कोटी रुपये आहे.

लंडनमध्येही आलिशान घर

सौरव गांगुलीकडे लंडनमध्ये आलिशान 2 बीएचके अपार्टमेंट आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार त्याच्या या फ्लॅटची किंमत 5 कोटींहून अधिक आहे.

जाहिरातीतूनही कमाई

सौरव गांगुली निवृत्त झाला असला तरी त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये फारसा फरक पडलेला नाही. आजही जाहिरातीतून गांगुली मोठी कमाई करतो.

एका जाहिरातीचे इतके घेतो पैसे

गांगुली एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी दरवर्षी एक कोटी 35 लाख रुपये घेतो. याशिवाय सौरवने बंगाली टीव्ही शो दादागिरी देखील होस्ट केला आहे, ज्यासाठी तो दर आठवड्याला एक कोटी रुपये घेत असे.

गांगुली आलिशान गाड्यांचा मालक

सौरव गांगुलीला लक्झरी वाहनांचा शौक आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या कार आहेत. त्याच्याकडे 72 लाख रुपयांची मर्सिडीज जीएल, 62 लाख रुपयांची रेंज रोव्हर, ऑडी, सीएलके कन्व्हर्टेबल, बीएमडब्ल्यू सीरीज कार आहेत.

सौरव गांगुली नेट वर्थ

सौरव गांगुली पगारातून दरवर्षी 24 कोटींहून अधिक कमावतो. त्याचे मासिक उत्पन्न 2 कोटी रुपयांच्या जवळपास आहे आणि दादाची एकूण संपत्ती 700 कोटींच्या जवळपास आहे. (सर्व फोटो - सौरव गांगुली/ Instagaram)

VIEW ALL

Read Next Story