लग्न न करताच बाप झाला हा स्टार क्रिकेटपटू

या क्रिकेटपटूने स्वत: यासंदर्भातील माहिती दिली

पुत्ररत्न प्राप्ती

इंग्लंडचा स्टार क्रिकेटपटू जॉनी बेअरस्टोला पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे.

स्वत: दिली माहिती

जॉनी बेअरस्टोने सोशल मीडियावरुन स्वत: याबद्दलची माहिती दिली आहे.

दोघांची प्रकृती ठणठणीत

मला आणि माझ्या गर्लफ्रेण्डला मुलगा झाला आहे. दोघांचीही प्रकृती ठणठणीत आहेत, असं जॉनी बेअरस्टोने इन्स्ताग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

मुलाच्या नावाचीही घोषणा

जॉनी बेअरस्टोने मुलाच्या नावाचीही घोषणा केली आहे. मुलाचं नाव एडवर्ड बेअरस्टो असल्याचं जॉनीने सांगितलं आहे.

अविवाहित वडील

जॉनी बेअरस्टो अविवाहित आहे. म्हणजेच लग्न न करताच तो वडील झाला आहे.

दोघांचे फोटो शेअर केले नाहीत

जॉनी बेअरस्टोने त्याच्या गर्लफ्रेण्डचा आणि मुलाचा फोटो शेअर केलेला नाही.

गर्लफ्रेण्डची माहिती जाहीर केली नाही

जॉनी बेअरस्टोची गर्लफ्रेण्ड नेमकी कोण आहे याबद्दलची कोणतीही माहिती त्याने सार्वजनिक केलेली नाही.

कधीच शेअर केला नाही फोटो

जॉनी बेअरस्टोने सोशल मीडियावर कधीच आपल्या गर्लफ्रेण्डचा फोटो शेअर केलेला नाही.

कधीच मैदानावर दिसली नाही

जॉनी बेअरस्टोची गर्लफ्रेण्ड कधी त्याला पाठिंबा देण्यासाठी मैदानावर आल्याचंही दिसलेलं नाही.

VIEW ALL

Read Next Story