#HappyBirthdayKingKohli : किंग कोहली एका वर्षात किती कमावतो?

विराट कोहली रविवारी 5 नोव्हेंबरला आपला 35 वा वाढदिवस साजरा करणार आहे. विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारताचा सामना साऊथ आफ्रिकेशी होणार आहे.

सेंच्युरी ठोकून किंग कोहली आपला वाढदिवस साजरा करेल अशी अपेक्षा भारतीयांची आहे. त्याचा वाढदिवसानिमित्त विराट वर्षाला किती कमावतो यावर एक नजर टाकूयात.

विराट कोहलीची एकूण संपत्ती 1050 कोटी एवढी आहे. या आकड्यानुसार तो जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे.

BCCI ने विराट कोहलीसोबत A+ ग्रेड हा वार्षिक करार केला आहे. त्यानुसार त्याला 7 कोटींचं मानधन मिळतं.

त्याला प्रत्येक कसोटीसाठी 15 लाख, ODI साठी 6 लाख तर T20 साठी त्याला 3 लाख देण्यात येतात.

तर किंग कोहलीला आयपीएल फ्रँचायझी RCB कडून 2023 च्या सिझनसाठी 15 कोटी देण्यात आले आहे.

याशिवाय विराट अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या जाहिरातींमधून कमाई करतो. ते 18 प्रसिद्ध ब्रँडचा प्रचार करतो.

प्रत्येक ब्रँडकडून त्याला वर्षाला 7.5 ते 10 कोटी मिळतात. यातून त्याला एकूण 175 कोटींची कमाई होते.

VIEW ALL

Read Next Story