भारतीय फलंदाज विराट कोहलीची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते.

आपल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर त्याला 'किंग कोहली' असंही म्हंटलं जातं.

दरम्यान, विराटने आयसीसी स्पर्धेत आपल्या बॅटने मोठा विक्रम केला.

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आता व्हाइट बॉल ICC टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे.

त्याने हा विक्रम करून सचिन तेंडुलकरला मागे सोडले. सचिनने मर्यादित षटकांच्या आयसीसी टूर्नामेंटमध्ये 2719 धावा केल्या आहेत.

विराट कोहलीने हा विक्रम ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेपॉकमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान केला.

एवढेच नाही तर विराटने आयसीसी विश्वचषक (ODI आणि T20) च्या इतिहासात नॉन ओपनर म्हणून सर्वाधिक धावा केल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story