IND vs AUS : विराट-रोहित वर्ल्डकपसाठी मानसिकरित्या...; पहिल्या 2 सामन्यांमध्ये आराम देण्यावर राहुल द्रविड यांचा खुलासा

22 सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात येणार आहे. दरम्यान वनडे वर्ल्डकपसाठी पुन्हा एकदा प्रयोग करण्यात येणार आहे.

पहिल्या दोन वनडे सामन्यासाठी रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांना आराम दिला गेला आहे. यावेळी टीमच्या कर्णधारपदाची धुरा केएल. राहुलकडे असणार आहे.

पहिल्या दोन सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आराम का देण्यात आला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत आता कोच राहुल द्रविड यांनी खुलासा केला आहे.

द्रविड म्हणाले, विराट आणि रोहित शर्मा या दोघांना आराम देण्याचा निर्णय चर्चा करूनच घेतलेला आहे.

हे दोन्ही खेळाडू वनडे वर्ल्डकप 2023 साठी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षण असणं गरजेचं आहे, असंही द्रविड म्हणाले.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिला वनडे सामना 22 सप्टेंबर, तर दुसरा वनडे सामना 24 सप्टेंबरला असणार आहे.

VIEW ALL

Read Next Story