सरफराज, जुरेलला सेंट्रल कॉन्ट्रेक्टमध्ये स्थान नाही, काय आहे नियम?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा केली आहे. यात 30 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

6 दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता

बीसीसीआयने 6 दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यात ईशान किशन, श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल, चेतेश्वर पुजारा, शीखर धवन आणि उमेश यादवचा समावेश आहे.

यशस्वी जयस्वाल, रजत पाटीदार, केएस भरत

विशेष म्हणजे त्यांच्या जागी युवा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल, रजत पाटीदार, केएस भरत यांचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश करण्यात आला आहे.

सरफराज कान आण ध्रुव जुरेल

रांची कसोटीतले स्टार फलंदाज सरफराज कान आण ध्रुव जुरेललाही बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये स्थान दिलेलं नाही.

बीसीसीआयचा नियम

सरफराज-जुरेलला बाहेर ठेवण्याचं कारण म्हणजे बीसीसीआयचा नियम. कमीत कमी 3 कसोटी, 8 वन डे किंव 10 टी20 खेळणाऱ्या खेळाडंचा यात समावेश केला जातो.

सरफराज आणि जुरेल दोन कसोटी सामने खेळलेत. धरमशाला कसोटीत प्लेईंग इलेव्हनमध्ये ते कायम राहिल्यास त्यांची ग्रेड सी मध्ये समावेश होऊ शकतो.

बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टनुसार खेळाडूंना ग्रेडनुसार एक कोटी ते सात कोटी रुपये वार्षिक वेतन मिळतं.

VIEW ALL

Read Next Story