यंदाच्या IPL लिलावात 'या' World Cup स्टार्सवर पडणार पैशांचा पाऊस; शेवटचं नाव थक्क करणारं

स्पर्धेवर छाप सोडली

भारतात सुरु असलेल्या वर्ल्ड कप 2023 मध्ये तरुण खेळाडूंनी आपल्या खेळाने स्पर्धेवर छाप सोडली आहे.

संघ मालकांमध्ये रस्सीखेच

या तरुणांचा खेळ पाहून यंदाच्या इंडियन प्रिमिअर लिगच्या पर्वामध्ये या खेळाडूंना करारबद्ध करुन घेण्यासाठी आयपीएल संघ मालकांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळेल.

वाटेल तेवढी रक्कम मोजण्यासाठी तयार

या तरुण खेळाडूंपैकी काही खेळाडूंना आपल्या संघातून खेळवण्यासाठी संघमालक वाटेल तेवढी रक्कम मोजण्यासाठी तयार असतील अशी शक्यता आहेत. असेच 6 खेळाडू कोणते ते पाहूयात...

हॉट फेव्हरेट चॉइस

न्यूझीलंडचा सलामीवर 23 वर्षीय रचिन रविंद्र यंदाच्या आयपीएलमधील हॉट फेव्हरेट असेल यात शंका नाही.

कोट्यवधी रुपये मिळण्याची शक्यता

न्यूझीलंडकडून खेळताना यंदाच्या पर्वात 3 शतकं रचिनने लगावली आहेत. त्याला आयपीएलचे संघमालक कोट्यवधी रुपये मोजून संघात घेतील.

23 वर्षीय खेळाडूही चर्चेत

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये नेदरलॅण्डच्या यशामागे असलेल्या प्रमुख खेळाडूंपैकी एक म्हणजे 23 वर्षीय बास डी लीडे.

फलंदाजी आणि गोलंदाजीमध्येही उत्तम

बास डी लीडे हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. तो फलंदाजी आणि गोलंदाजीमध्येही फारच उत्तम आहे. त्याला आयपीएलमध्ये चांगली बोली मिळू शकते.

श्रीलंकन फिरकीपटू

दुनिथ वेललेज या 20 वर्षीय श्रीलंकन फिरकीपटूने जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं यंदाच्या वर्ल्ड कप 2023 मध्ये लक्ष वेधून घेतलं आहे.

विराट, रोहित, शुभमनला केलेलं बाद

विराट, रोहित, शुभमन या तिघांना अवघ्या 13 चेंडूंमध्ये एकामागोमाग एक तंबूत परत पाठवणाऱ्या दुनिथला आयपीएलमध्ये उत्तम बोली मिळेल.

दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाचीही चर्चा

जेराल्ड कोएत्झी या दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाने आपल्या प्रभावी कामगिरीची छाप सोडली असून पहिल्या 5 सामन्यात 12 विकेट्स घेतल्यात.

फलंदाजी करण्यातही पटाईत

वेगवान गोलंदाजीबरोबर तळाशी परिस्थितीनुसार फलंदाजी करण्यातही 23 वर्षीय जेराल्ड कोएत्झी पटाईत आहे.

या 21 वर्षीय खेळाडूला उत्तम बोली मिळू शकते

अफगाणिस्तानचा 21 वर्षीय सलामीवीर इब्राहिम जार्दानला यंदाच्या आयपीएलमध्ये उत्तम बोली मिळू शकते.

तो आयपीएलमध्ये दिसला तर आश्चर्य वाटू नये

इब्राहिम जार्दान हा स्फोटक सलामीवर असून तो यंदाच्या आयपीएलमध्ये एखाद्या संघातून खेळताना दिसल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.

भारतीय वंशाचा नेदरलॅण्डमधील खेळाडूही चर्चेत

नेदरलॅण्डमधील भारतीय वंशाचा फिरकीपटू आर्यन दत्तच्या फिरकीच्या जादूनेही अनेकांना त्याची दखल घेण्यास भाग पाडलं आहे.

चांगल्या बोलीची शक्यता

यंदाच्या आयपीएलमध्ये आर्यनवर चांगली बोली संघमालकांकडून लावली जाण्याची शक्यता आहे.

VIEW ALL

Read Next Story