शोल्डर सर्फिंग

सर्वात सामान्य एटीएम घोटाळ्यांपैकी एक म्हणजे शोल्डर सर्फिंग. शोल्डर सर्फिंगमध्ये एखाद्याच्या नकळत त्याच्या खांद्यावरुन नजर टाकून पिन चोरण्याचा प्रयत्न केला जातो.

कधी केली जाते शोल्डर सर्फिंग?

जेव्हा लोक एटीएम मशीन किंवा त्यांचे फोन वापरून व्यवहार करत असतात तेव्हा शोल्डर सर्फिंग केले जाते. शोल्डर सर्फिंगद्वारे तुमचा पिन, पासवर्ड, युजरचे नाव किंवा इतर महत्त्वाची माहिती चोरली जाते.

कशी होते शोल्डर सर्फिंग?

एटीएम वापरत असताना गुन्हेगार अनोळखी व्यक्तीच्या खांद्यावरुन पाहतात. त्यांचा उद्देश पासवर्ड आणि पिन नंबर यासारखी वैयक्तिक माहिती चोरणे असतो.

कुठे होते शोल्डर सर्फिंग?

शोल्डर सर्फिंग सहसा व्यवहाराच्या ठिकाणी केले जाते जिथे भरपूर रहदारी असते. जिथे फॉर्म भरले जातात, एटीएममध्ये पिन टाकला जातो अशा ठिकाणी शोल्डर सर्फिंग केली जाते.

आणखी कशी होते शोल्डर सर्फिंग?

चोर एटीएम मशीनच्या आजूबाजूला उभा राहू शकतो आणि ती व्यक्ती त्यांचा पिन नंबर कसा टाकत आहे हे पाहण्यासाठी त्याच्या शेजारी उभा राहू शकतो.

कसे राहाल सुरक्षित?

शोल्डर सर्फिंग सारख्या घटना टाळण्यासाठी तुम्हाला सतर्क राहणे गरजेचं आहे. तुमच्या एका चुकीमुळे मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं

स्टेप 1

अनोळखी व्यक्तींची कधीही मदत घेऊ नका. एटीएममध्ये इंजिनीअर किंवा बँक कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त विश्वासार्ह असतात.

स्टेप 2

तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीबद्दल जागरुक रहा आणि तुमची स्क्रीन पाहण्याचा प्रयत्न करत असलेल्या कोणत्याही संशयित व्यक्तीपासून सावध रहा.

स्टेप 3

एटीएममध्ये तुमचा पिन टाकताना स्क्रीन आणि कीपॅड सुरक्षित ठेवण्यासाठी तुमचा हात वापरा. यामुळे तुमचा पिन कोणत्याही कॅमेरा किंवा अन्य उपकरणाद्वारे चोरीला जाण्याची शक्यता कमी होते.

स्टेप 4

एटीएम स्क्रीनभोवती कोणतेही संशयास्पद कॅमेरे आहेत का ते तपासा. कॅमेरा तुमच्या गोपनीयतेचे उल्लंघन करत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, एटीएम वापरू नका आणि तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांना सांगा (सर्व फोटो - freepik.com)

VIEW ALL

Read Next Story