15 हजारापेक्षा कमी किंमतीत मिळणारे बेस्ट Smartphones

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि 15 हजारांपेक्षा कमी बजेट असेल तर बाजारात अनेक 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत.

अशा 5 स्मार्टफोन्सबद्दल जाणून घ्या, जे तुम्ही 15 हजारापेक्षा कमी किंमतीत विकत घेऊ शकता.

Realme 12x 5G:

Realme 12x 5G ची किंमत 4GB RAM/128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 11,999 रुपये, 6GB RAM/128GB व्हेरिएंटसाठी 13 हजार 499 आणि 8GB RAM/128GB व्हेरिएंटसाठी 14 हजार 999 इतकी आहे.

बजेट स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 950 nits पीक ब्राइटनेससह 6.72-इंचाचा फुल HD+ LCD डिस्प्ले आहे.

Vivo T3x 5G:

Vivo T3x ची किंमत 13,999 पासून सुरू होते. यामध्ये 128GB स्टोरेज आणि 4GB RAM मिळतो. 6GB आणि 8GB ची किंमत अनुक्रमे 14,999 आणि 16,499 आहे.

Vivo T3x मध्ये 6.72-इंचाचा फ्लॅट फुल HD+ LCD डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश रेटसह आहे. Android 14 वर आधारित FuntouchOS 14 वर चालणाऱ्या 44W जलद चार्जिंग सपोर्टसह स्मार्टफोनला मजबूत 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Motorola G64 5G:

Motorola चा हा स्मार्टफोन 14 हजार 999 रुपयात मिळतो. यामध्ये 8GB RAM/128GB स्टोरेज आहे. 12GB RAM/256GB स्टोरेजसाठी 16 हजार 999 रुपये मोजावे लागतील.

G64 5G मध्ये 6.5 इंच फुल HD+ IPC LCD डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेट आणि 560 nits च्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट आहे.

Realme Narzo 70 5G:

Realme Narzo 70 5G स्टार्टची किंमत 6GB RAM/128GB स्टोरेजसाठी 14 हजार 999 आणि 8GB RAM/128GB स्टोरेजसाठी 15,999 आहे.

स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1,200 nits च्या पीक ब्राइटनेससह 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे.

Samsung Galaxy F15 5G:

Samsung Galaxy F15 5G ने मार्च महिन्यात भारतीय बाजारपेठेत पदार्पण केलं असून चांगला पर्याय आहे. स्मार्टफोनला 6,000mAh बॅटरी आणि 4 वर्षांच्या OS अपडेट्ससाठी सपोर्ट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

4GB RAM/128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 12,999 आहे. 8GB RAM/128GB स्टोरेज व्हेरियंट 17,999 पर्यंत जाते.

VIEW ALL

Read Next Story