गाडीचा ब्रेक फेल

काही तांत्रिक अडचणीमुळे गाडीत बिघाड होतो आणि चालत्या गाडीचा ब्रेक काम करणं बंद करतो. गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देताना अशा प्रसंगावेळी काय करायचं हे सांगितले जाते. पण त्या गोष्टी लक्षात ठेवल्या जात नाहीत.

गाडी कशी थांबवावी..

त्यामूळेच आज गाडीचे ब्रेक फेल झाले तर काय करावे?, गाडी कशी थांबवावी याची माहिती जाणून घ्या. जेणेकरुन जीवाला मुकावे लागणार नाही.

एक्सीलरेटरवरून पाय बाजूला घ्या

ब्रेक फेल झाल्याचे जेव्हा लक्षात येईल तेव्हा एक्सीलरेटरवरून हळूहळू पाय काढा. गाडीचा वेग हळूहळू कमी करा, जेव्हा तुमच्या वाहनाचा वेग कमी होईल तेव्हा तुम्ही हँड ब्रेक ओढून गाडी थांबवू शकता.

कारचे सर्व गीअर्स काढा

तुम्ही गाडी चालवत असाल आणि गाडीचे ब्रेक अचानक बंद झाले. तर, कारचे सर्व गिअर्स एक-एक करून काढा. त्यामुळे वाहनाचा वेग आपोआप कमी होऊ लागेल. आणि जेव्हा वाहनाचा वेग कमी झाल्यास गाडीतून उडी मारून तूम्ही खाली उतरू शकता.

हँड ब्रेक वर-खाली करत राहा

जेव्हा गाडीचा वेग हळूहळू कमी होऊ लागतो. तेव्हा सर्व तुम्ही पार्किंग ब्रेक ब्रेक हळू हळू वर खाली हलवत रहा. जेणेकरून गाडी थांबेल.

गाडीच्या काचा उघडा

अशा अडचणीत गाडीतील सर्व लाईट ऑन करा. तसेच सर्व काचा उघडा. लाईटमूळे वाहनचालकांना सिग्नल मिळेल. ज्यामुळे तुम्ही इतरांसोबत सुरक्षित राहाल. कारच्या काचा उघड्या ठेवल्यास वाऱ्यामूळे गाडीचा वेग कमी होण्यास मदत होईल.

रिव्हर्स गियर टाकू नका

अशा स्थितीत कार चुकूनही रिव्हर्स गियरमध्ये टाकू नका. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एक्सलेटरचा वापर करू नका आणि फक्त क्लचचा वापर करा. अशा स्थितीत तुम्ही एसीदेखील ऑन करू शकता. त्यामुळे इंजिनवर दाब वाढेल आणि वेग कमी होईल.

गाडीचे इंजिन बंद करा

जर तुमच्याकडे कोणताही उपाय नसेल, तर वाहनाचे इंजिन बंद करा. हा उपाय सर्वात फायदेशीर आहे, ज्यामुळे जीव वाचण्याची शक्यता जास्त आहे. इंजिनच बंद केल्याने गाडी हळू हळू थांबते. आणि तूमचा जीव वाचू शकतो.

वाहन टेकडावर चालवा

ब्रेक फेल झालेल्या गाडीला वाळू किंवा चिखल थांबवू शकतो. चिखलात गाडीची चाके रूतुन बसतात आणि गाडी थांबते. गाडी जास्त वेगात पळत असेल तर गाडीच्या स्टेअरिंगवर कंट्रोल मिळवा आणि गाडी उंचावर न्या.

खडकाळ रस्ता करेल मदत

तुम्हाला तुमची गाडीर सपाट रस्त्यावर, दुभाजकावरून थांबवता येत नसेल, तर गाडी जास्त शेती असेल किंवा पाणवठा, मातीच्या रस्त्यावर न्या. यामूळे खडकाळ रस्त्यावर गाडीचा वेग कमी होईल.

VIEW ALL

Read Next Story