Hero Splendor Plus

फक्त 18 हजार रुपयांत मिळतेय Hero Splendor Plus, कशी? ते पाहा...

बाईकची किंमत

Hero Splendor Plus : साधारण 65 ते 75 हजारांच्या किमतीत मिळणारी हिरो स्प्लेंडर प्लस ही बाईक तुम्हाला आता अवघ्या 18 हजार रुपयांत खरेदी करता येणार आहे. त्यामुळं आर्थित नियोजनाची चिंता करायला नको.

हिरोची ऑफर

हिरोकडून एक अशी Offer बाईकप्रेमींसाठी आणली गेली आहे जिथं तुम्ही ही बाईक चक्क 18 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. विश्वास बसत नाहीये?

हिरो स्प्लेंडर प्लस टॉप मॉडेल

हिरो स्प्लेंडर प्लसचं टॉप मॉडेल सध्या 75 हजारांना विकलं जात आहे. ऑनरोड त्याची किंमत 90 हजारांच्या घरात जातेय. पण, आता तुम्ही अवघ्या 18 हजार रुपयांच्या Down Payment मध्ये ही बाईक खरेदी करु शकता.

बाईकसाठी कर्ज

समजा तुम्ही तीन वर्षांसाठीचं कर्ज घेतलं तर तुम्हाला तीन वर्षांमध्ये दर महिन्याला 2603 रुपये इतका कर्जाचा हप्ता पडेल. काही दमदार फिचर्ससह ही बाईक तुम्हाला घरी नेता येणार आहे. बाईकच्या टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला XTec टेक्नोलॉजीचा वापर केल्याचं लक्षात आलेला आहे.

डिजिटल इंन्स्ट्रुमेंट क्लस्टर

बाईकमध्ये तुम्हाला कॉल, एसएमएस अलर्ट, ब्लूटूथ कनेक्टिव्हीटीस संपूर्ण डिजिटल इंन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे. जिथं तुम्हाला बाईकशी संबंधित माहितीही पाहता येईल.

एलईडीचा प्रयोग

बाईकच्या हेडलाईट आणि टेललाईटमध्ये एलईडीचा प्रयोग करण्यात आला आहे. जिथं आइडियल स्टार्ट स्टॉप सिस्टमचा वापर केल्याचं पाहायला मिळतं. 97 सीसीचं इंजिन असणारी ही बाईक तुम्हाला 65 किमी प्रतिलीटर इतकं मायलेज देते. त्यामुळं चांगली पॉवरही जनरेट होते.

VIEW ALL

Read Next Story