Honda ची नवीकोरी बाईक

चालता चालता बंद पडतेय Honda ची नवीकोरी बाईक; कंपनीनं परत मागवले हजारो मॉडेल्स

रॉयल एनफिल्डला टक्कर

होंडानं काही दिवसांपूर्वीच H`ness CB350 आणि CB350RS या बाईक लाँच केल्या. 350 सीसीच्या सेगमेंटमध्ये या बाईक रॉयल एनफिल्डला टक्कर देतेय.

बाईक परत मागवण्यात आल्या

इथं ऑटो जगतामध्ये या बाईकची चर्चा सुरु असतानाच इथं कंपनीकडून आता या बाईक परत मागवण्यात आल्या आहेत. कंपनीच्या मते हे एक वॉलेन्ट्री रिकॉल अर्थात एक स्वैच्छिक रिकॉल आहे.

काय आहेत त्रुटी?

कंपनीच्या माहितीनुसार दोन्ही बाईकच्या रिअर स्टॉप लाईट म्हणजेच बाईकच्या मागील लाईट स्विचर आणि बॅक अँगल सेन्सरमध्ये काही त्रुटी आढळल्यामुळं या बाईक परत मागवण्यात आल्या आहेत.

रिअर स्टॉप लाईट

बाईकच्या रिअर स्टॉप लाईटच्या रबर कॉम्पोनंट्समध्ये तडे असल्यामुळं त्यातून पाणी आत जाऊन गंज चढून लाईट खराब होण्याची शक्यता आहे.

सेन्सर बॉडी सिलिंग

चुकीच्या पद्धतीनं मोल्डिंग केल्यामुळं सेन्सर बॉडी सिलिंगमधून पाणी आत शिरून चालती बाईक बंद पडण्याचाही धोका आहे.

बाईक सेन्सर

2020 ते 2023 च्या बाईक रिअर लाईट आणि 2020 ते 2021 पर्यंतच्या बाईक सेन्सरमधील त्रुटींसाठी परत मागवण्यात आल्या आहेत.

बाईकचं परीक्षण होणार

कंपनीकडून परत मागवण्यात आलेल्या या बाईकचं परीक्षण करून गरज वाटल्यास त्यातील काही यंत्र/ पार्ट्स बदलण्यात येणार आहेत. यासाठी वाहनधारकांकडून कोणतीही रक्कम आकारली जाणार नाही.

VIEW ALL

Read Next Story