तुमच्यासोबतही असं घडलंय का?

तुम्हाला फक्त एका व्यक्तीला यूपीआयद्वारे पैसे द्यायचे होते पण चुकून तुम्ही ते दुसऱ्याला गेले. पण काळजी करु नका आणि पैसे परत मिळवण्यासाठी काही टिप्स फॉलो करा.

कस्टमर सर्व्हिससोबत संपर्क साधा

ताबडतोब तुमच्या बँकेच्या कस्टमर सर्व्हिससोबत संपर्क साधा. तसेच, त्यांना त्या व्यवहाराचा संदर्भ, तारीख, रक्कम आणि वेळ इत्यादी माहिती द्या.

सगळं प्रकरण सांगा

कस्टमर सर्व्हिसला संपूर्ण प्रकरण सांगा. पैसे चुकीच्या व्यक्तीकडे गेले असल्याची माहिती त्यांना द्या. अधिकारी तुमच्या माहितीचा वापर तुमच्या समस्येचे मूल्यांकन करण्यासाठी करतील.

योग्य वेळेत तक्रार करा

रिव्हर्सलचे प्रकरण सोडवताना बँकेला माहिती देण्याच्या वेळेचे निर्बंध लक्षात ठेवा. दिलेल्या वेळेत प्रक्रिया सुरू झाली की ती यशस्वी होण्याची शक्यता वाढते.

बॅंकेकडून मंजुरीची प्रतीक्षा करा

तुम्ही माहिती सबमिट केल्यानंतर, तुमची बँक तुमच्या तक्रारीची पडताळणी करेल. जर तक्रार स्वीकारली गेली आणि रिव्हर्सलसाठी आवश्यक माहिती पूर्ण केली तर ते पैसे तुम्हाला परत मिळतील.

वेळ लागू शकतो

तुमची बँक किंवा युपीआय सेवा प्रदाता तुम्हाला याबद्दल लेखी कळवेल. यशस्वीरित्या परत केलेली रक्कम तुमच्या खात्यात परत येईल. लक्षात ठेवा या प्रक्रियेस थोडा वेळ लागू शकतो.

सावध रहा

यूपीआय पेमेंट काही वेळेसच परत केले जाऊ शकतात. पण हा पर्याय नेहमीच उपयोगी पडत नाही. त्यामुळे हे सगळं टाळण्यासाठीआपल्या व्यवहारांवर लक्ष ठेवा आणि सावधगिरी बाळगा.

VIEW ALL

Read Next Story