जबरदस्त! OLA इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या किंमतीत 25 हजारांची कपात

OLA ने काही दिवसांपूर्वी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या किंमतीत मोठी कपात जाहीर केली होती. ही कपात फेब्रुवारी 2024 पर्यंत लागू होती.

कंपनीने आता ही ऑफर 31 मार्च 2024 पर्यंत वाढवली आहे. यामध्ये S1 Air, S1 X+ आणि S1 Pro यांचा समावेश आहे.

OLA इलेक्ट्रिक स्कूटरच्या खरेदीवर ग्राहक 25 हजारांपर्यंतच्या डिस्काऊंटचा लाभ घेऊ शकतात.

OLA S1 X+ इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1 लाख 10 हजार होती. पण आता 25 हजारांच्या कपातीसह ती 84 हजार 999 रुपयांत उपलब्ध आहे.

याशिवाय OLA S1 Air वर कंपनी 15 हजारांची सूट देत आहे. हिची किंमत 1 लाख 4 हजार 999 रुपये आहे.

OLA S1 Pro च्या किंमतीत 17 हजार 500 रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता या बाईकची किंमत 1 लाख 29 हजार 999 रुपयांपासून सुरु होत आहे.

S1 Pro सिंगल चार्जमध्ये 195 किमीची रेंज देते. हिचा टॉप स्पीड ताशी 120 किमी आहे. यामध्ये 4kWh बॅटरी पॅक आहे. तसंच 4 रायडिंग मोड्स मिळतात.

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये टचस्क्रीन, क्रूज कंट्रोल, नेव्हिगेशन, ओव्हर-द-इयर अपडेट, हिल होल्ड असिस्टसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

OLA Electric ने फेब्रुवारी महिन्यात एकूण 35 हजार युनिट्सची विक्री केली. 45 टक्के मार्केट शेअरसह कंपनीने या सेगमेंटमध्ये अव्वल स्थानी आहे.

VIEW ALL

Read Next Story