190KM रेंज आणि 8 वर्षांची वॉरंटी; OLA ने लाँच केली दमदार स्कूटर, किंमतही परवडणारी

OLA S1X (4kWH)

देशातील प्रमुख दुचाकी वाहन निर्माता कंपनी OLA Electric ने बाजारात आपल्या S1X रेंजमध्ये एक नवं व्हेरियंट लाँच केलं आहे. या दुचाकीला S1X (4kWh) नाव देण्यात आलं आहे.

कंपनीने S1X (4kWh) ची सुरुवातीची किंमत 1 लाख 9 हजार 999 रुपये ठेवली आहे. यामध्ये FAME2 सब्सिडीचाही समावेश आहे.

हे S1X लाइन-अपचं चौथं मॉडेल आहे. याआधी ही स्कूटर S1X (3kWh), S1X (2kWh) आणि S1 X+ (3kWh) व्हेरिंयंटमध्ये उपलब्ध होती.

या नव्या व्हेरियंटमध्ये कंपनीने 4kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. ही स्कूटर 190 किमी रेंज देते असा कंपनीचा दावा आहे.

आतापर्यंत टॉप व्हेरियंट म्हणून विकल्या जाणाऱ्या S1 X+ मॉडेलमध्ये कंपनीने 3kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला होता, जो सिंगल चार्जमध्ये 151 किमी रेंज देत होती.

6kW ची इलेक्ट्रिक मोटर

S1X (4kWh) व्हेरियंटमध्ये कंपनीने 6kW ची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे, जिचा टॉप स्पीड ताशी 90 किमी आहे. ही स्कूटर फक्त 3.3 सेकंदात ताशी 0 ते 40 किमी वेग पकडण्यात सक्षम आहे.

या स्कूटरमध्ये 4.3 इंचाचा एलसीडी इंस्ट्रूमेंट कंसोल देण्यात आलं आहे. तसंच इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे तीन मोड्स मिळतात.

एप्रिल 2024 पासून स्कूटरची डिलिव्हरी सुरु होणार आहे. S1X (3kWh), S1X (2kWh) यांचीही डिलिव्हरी तेव्हाच सुरु होईल.

कंपनीने S1X (2kWh) व्हेरियंटची किंमत फक्त 79 हजार 999 रुपये आहे. ही स्कूटर 95 किमी रेंज देते. हिचा टॉप स्पीड ताशी 85 किमी आहे.

S1X (3kWh) ची किंमत 89 हजार 999 रुपये आहे. सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर 190 किमी धावते आणि ताशी 90 किमीचा टॉप स्पीड देते.

कंपनी या स्कूटरच्या बॅटरीवर तब्बल 8 वर्षांची वॉरंटी देत आहे.

VIEW ALL

Read Next Story