Sale Alert: 50 MP कॅमेरा, 5000 mAh बॅटरी अन्... सर्वात स्वस्त 5G फोनवर घसघशीत सूट; किंमत...

घसघशीत सूट

भारतीय कंपनीने सर्वात स्वस्त फाइव्ह जी मोबाईलपैकी एक असलेल्या एका भन्नाट मॉडेलवर आजपासून घसघशीत सूट दिली आहे.

उत्तम पर्याय ठरु शकतो

तुम्ही सुद्धा नवीन मोबाईलच्या शोधात असाल तर हा उत्तम पर्याय ठरु शकतो.

कोणता फोन?

आपण इथे ज्या मोबाईलबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे 'लावा स्टोम फाइव्ह जी'! (LAVA Storm 5G)

5000 एमएएचची बॅटरी

'लावा स्टोम फाइव्ह जी'मध्ये 5000 एमएएचची बॅटरी आहे.

33 व्हॉल्टची फास्ट चार्जिंगची सोय

तसेच फोनमध्ये 33 व्हॉल्टची फास्ट चार्जिंगची सोय फोनमध्ये देण्यात आली आहे.

6.78 इंचांचा एफएचडी डिस्प्ले

'लावा स्टोम फाइव्ह जी'मध्ये 6.78 इंचांचा एफएचडी डिस्प्ले देण्यात आला असून रिफ्रेश रेट 120 एचझेड इतका आहे.

50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

लावाच्या या फोनमध्ये 50 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सलचे कॅमेरा देण्यात आले आहेत.

उत्तम सेल्फी कॅमेरा

16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरामुळे 'लावा स्टोम फाइव्ह जी'मध्ये सेल्फी फोटो फारच उत्तम येतात.

28 डिसेंबरपासून अ‍ॅमेझॉनवर सेल

'लावा स्टोम फाइव्ह जी' मोबाईलवर आजपासून म्हणजेच 28 डिसेंबरपासून अ‍ॅमेझॉनवर सेल सुरु झाला आहे.

आधीच एमआरपीपेक्षा कमी किंमत त्यात सूट

14 हजार 999 एमआरपी असलेला फोन आधीच 13 हजार 499 रुपयांना उपलब्ध आहे. मात्र याहूनही स्वस्तात फोन उपलब्ध आहे.

दीड हजारांची सूट

अ‍ॅमेझॉनवरील सेलअंतर्गत 2 रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या या फोनवर दीड हजारांची सूट देण्यात आली आहे.

फोनची किंमत किती?

दीड हजारांची सूट देण्यात आल्याने या सेलदरम्यान 'लावा स्टोम फाइव्ह जी' मोबाईल अ‍ॅमेझॉनवरुन 11,999 रुपयांना विकत घेता येणार आहे.

VIEW ALL

Read Next Story