YouTube ने अलीकडेच अ‍ॅड ब्लॉकर्सवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. तर बरेच लोक YouTube वर जाहिरात टाळण्यासाठी अ‍ॅड ब्लॉकर वापरतात.

तर अ‍ॅड ब्लॉकरच नाही पण आता कंपनी ग्राहकांकडून अधिक पैसे कमवण्यासाठी प्रीमियम प्लॅनच्या किंमती वाढवत आहे. या दरम्यान कोणत्या यूजर्सला किती किंमत भरावी लागेल हे बघूया

अनेक देशांमध्ये YouTube Premium महाग होणार आहे. Google अधिकृत व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आपल्या यूजर्सकाढून रेवेन्यू वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडेच कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर अ‍ॅड ब्लॉकर्सवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे.

कंपनी अनेक देशांमध्ये प्रीमियम सबस्क्रिप्शन महाग करत आहे.

सात देशांमध्ये YouTube ने आपल्या प्रीमियम सबस्क्रिप्शनची किमतीत वाढवली आहे . वाढलेले दर १ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत.

YouTube ने अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, चिली, जर्मनी, पोलंड आणि तुर्कीमध्ये आपल्या प्रीमियम योजनांच्या किमती वाढवल्या आहेत. तर याचे भारतात कोणतेही परिणाम होणार नाही आहे.

YouTube यूजर्सना 139 रुपये मासिक शुल्क देऊन सेवा मिळेल. कंपनी 399 रुपयांमध्ये तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन ऑफर करते. तर एका वर्षाच्या सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला १२९० रुपये खर्च करावे लागतील.

VIEW ALL

Read Next Story