पावसाळ्यात फ्रिजचं Temperature किती असावं? पाहा तज्ज्ञ काय सांगतात

पदार्थ फ्रेश ठेवण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. मात्र फ्रिजचं तापमानही नियंत्रित करणं महत्त्वाचं असतं. ते पावसाळ्यात किती असावं पाहूयात...

फ्रिजच्या तापमानाबद्दल संभ्रम

मात्र फ्रिजचं तापमान नेमकं किती हवं हे अनेकांना ठाऊक नसतं. सध्या पावसाळ्याच्या सिझनमध्ये तर फ्रिजचं तापमान किती हवं हे अनेकांना कळत नाही. त्याबद्दलच जाणून घेऊयात...

उष्णता कमी आणि आर्द्रता अधिक

पावसाळ्यामध्ये वातावरणातील उष्णता कमी असते. मात्र हवेतील आर्द्रता अधिक असते. त्यामुळेच पदार्थ फ्रेश ठेवण्यासाठी फ्रिजचं तापमान संतुलत ठेवणं महत्त्वाचं असतं.

मान्सूनमध्ये किती असावं तापमान?

सॅमसंगने आपल्या एका ब्लॉगमध्ये फ्रिजचं तापमान मान्सूनच्या सिझनमध्ये किती असावं याबद्दलची माहिती दिली आहे. त्यांच्या सांगण्यानुसार हे तापमान 3 डिग्री सेल्सिअस असावं.

फ्रिजरचं तापमान किती?

सॅमसंगच्या माहितीनुसार फ्रिजरचं तापमान उणे 19 डिग्री सेल्सिअस असावं.

सामान्यपणे किती ठेवावं तापमान

या क्षेत्रातील जाणकारांच्या माहितीनुसार मान्सून किंवा कोणत्याही कालावधीमध्ये फ्रिजचं तापमान हे 1.7 डिग्री ते 3.3 डिग्रीदरम्यान ठेवावं.

पदार्थ दिर्घकाळ फ्रेश राहतात

1.7 डिग्री ते 3.3 डिग्रीदरम्यान विषाणूंची वाढ होत नाही. तसेच पदार्थ दिर्घकाळ फ्रेश राहतात.

5 डिग्रीपेक्षा कमी

सर्वसाधारणपणे सांगायचं झाल्यास फ्रिजचं तापमान 5 डिग्रीपेक्षा कमी ठेवावं.

वेगवेगळे पर्याय

फ्रिजच्या वेगवेगळ्या मॉडल्समध्ये तापमानासंदर्भात वेगवेगळे पर्याय मिळतात. त्यामुळे त्यामधील बदलही तापमान ठरवताना लक्षात घ्यावेत.

वेगवेगळे मोड्स

अनेक फ्रिजमध्ये वेगवेगळ्या सिझननुसार वेगवेगळे मोड्स देण्यात आलेले असतात.

मान्सून मोड निवडा

थेट मान्सून मोडवरही फ्रिजचं तापमान ठेवण्याचा पर्याय सध्याच्या अनेक फ्रिजमध्ये उपलब्ध असतो.

सामान्य माहितीवर आधारित

Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.

VIEW ALL

Read Next Story