नव्या नियमामुळे गोची

युरोपियन महासंघाच्या नव्या नियमांचं पालन करण्यासाठी व्हॉट्सअप नवीन फिचरवर काम करत आहे.

चॅट ऑप्शनवर काम सुरु

कंपनी सध्या थर्ड पार्टी चॅट ऑप्शनवर काम करत आहे. नॉन-युझर्सला व्हॉट्सअप युझर्सला मेसेज पाठवण्यासाठी हे थर्ड पार्टी चॅट मदत करतात.

'थर्ड पार्टी चॅट'

नॉन युझर्सने पाठवलेले मेसेज युझर्सला 'थर्ड पार्टी चॅट' पर्यायामध्ये दिसतील. या अपडेटची माहिती वाबिटाइन्फो या वेबसाईटने शेअर केली आहे.

केवळ युरोपमध्ये

हे अपडेट नक्की कधी मिळणार याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. मात्र हे फिचर कसं काम करणार याची चर्चा असली तरी हे केवळ युरोपमध्ये लॉन्च केलं जाणार आहे.

ती माहिती देण्यात आलेली नाही

इतर देशांमध्ये हे फिचर येणार का याबद्दलची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. या फिचरच्या मदतीने व्हॉट्सअप अकाऊंट नसणाऱ्यांनाही व्हॉट्सअपवरुन मेसेज पाठवता येईल.

6 महिन्यांचा कालावधी देण्यात आला

युरोपियन महासंघाने आपल्या इंटरऑपरेबिलिटी सेवा पुरवण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी दिला असून पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत हे फिचर युझर्ससाठी उपलब्ध होईल.

नवीन अपडेट्ससाठी...

तुम्हालाही व्हॉट्सअपवरील नवीन अपडेट जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही बीटा प्रोग्रामअंतर्गत एनरोल करु शकता.

गेटकीपर्स म्हणून निर्देशित

युरोपियन डिजीटल मार्केट कायद्याने काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअपची पालक कंपनी असलेल्या मेटासहीत अल्फाबेट, अॅमेझॉन, बाइटडान्स, अॅपल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांना गेटकीपर्स म्हणून निर्देशित केलं आहे.

एप्रिल 2024 पर्यंत डेडलाइन

व्हॉट्सअपसहीत या सर्व कंपन्यांना एप्रिल 2024 पर्यंत नवीन नियमांचं पालन करावं लागणार आहे. मेसेज प्लॅटफॉर्मला त्याची सेवा न वापरणाऱ्यांकडूनही सेवा वापरणाऱ्यांना मेसेज येतील अशी सेवा द्यावी लागणार आहे.

VIEW ALL

Read Next Story