+91 पासूनच का सुरू होतो फोन नंबर? यामागचं कारण काय?

भारतातील सर्व फोन नंबरच्या मागे +91 हा कोड का लिहला जातो. या कोडला कंट्री कोड का म्हटलं जातं? पण भारताला +91 कोडच का मिळाला?

असे प्रश्न तुम्हाला कधी पडलेत का? यासाठी आपल्याला कंट्री कोडची सिस्टम समजून घेणे आवश्यक आहे. कंट्री कॉलिंग कोड या कंट्री डायल-इम कोडचा वापर टेलीफोन नंबर प्रीफिक्सच्या आधारे म्हणजेच फओन नंबरच्या पुढे असतो.

कंट्री कोड इंटरनॅशनल टेलीफोन नंबरिंग प्लानचा भाग आहे. याचा वापर एका देशातून दुसऱ्या देशात कॉलिंगसाठी केला जातो. आपल्या देशात असताना हा कोड आपोआप लावला जातो.

भारतात +91 कोडचा वापर केला जातो. तर, पाकिस्तानात +92 या कोडचा वापर केला जातो. या कोडला इंटरनॅशनल सब्सक्रायबर्स डायलिंगदेखील म्हटलं जातं.

या कोडला आंतरराष्ट्रीय टेलीकम्युनिकेशन युनियन (ITU) कडून जारी केले जाते. ही एक स्पेशल एजन्सी आहे जी युनायटेड नेशन्सचा एक भाग आहे. याची सुरुवात 17 मे 1865 मध्ये झाली होती.

त्याकाळी या एजन्सीचा नाव इंटरनॅशनल टेलीग्राफ युनियन असं होतं. ही एजन्सी इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नोलॉजीसंबंधीत सर्व मुद्द्यांवर काम करते.

या कंपनीचे मुख्यालय जेनेवामध्ये आहे. या युनिअनमध्ये 193 देश आहेत. कंट्री कोड जारी करणे या एजन्सीच्या एकूण कामांपैकी एक आहे.

कोणत्या देशाला कोणता कोड मिळणार हे त्या झोन आणि नंबरवर आधारे ठरते. भारत नवव्या झोनमधील पहिला देश आहे त्यामुळं +91 हा कोड देण्यात आला आहे.

VIEW ALL

Read Next Story