एका चार्जमध्ये 800 KM रेंज, भन्नाट लूक अन्...; Xiaomi ची पहिली EV बाजारात

शाओमीची आपली पहिली इलेक्ट्रिक

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने आज अधिकृतरित्या आपली पहिली इलेक्ट्रिक कार जगासमोर आणली.

पहिली झलक

शाओमीने आपल्या 'स्ट्राइड' नावाच्या एव्हेंटमध्ये कंपनीने पहिल्या 'एसयू 7' या कारची झलक दाखवली.

उत्तम डिझान

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 'एसयू 7' ही एक सेडान कार आहे. ही कार फारच आकर्षक असून डिझानही उत्तम आहे.

तंत्रज्ञानाची माहिती

कंपनीने प्रत्यक्षात आपल्या 'स्ट्राइड' एव्हेंटमध्ये कार दाखवली नाही. मात्र या कारसाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. शिओमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लेई जून यांनी सोशल मीडियावरही माहिती शेअर केली.

कारचं कॉन्फिगरेशन कसं?

एका करारानुसार शिओमीची ही कार बीजिंग ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री होल्डिंग कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून तयार केली जाईल. या कारची लांबी 4997 मिलीमीटर, रुंदी 1963 मिलीमीटर, उंची 1455 मिलीमीटर आणि व्हीलबेस 3000 मिलीमीटर इतका आहे.

2 वेगवेगळ्या टायरचे व्हेरिएंट

शिओमीच्या कारमध्ये 2 वेगवेगळ्या टायरचे व्हेरिएंट उपलब्ध आहेत. एकामध्ये चाकाचा व्यास हा 19 इंचाचा असेल तर एकामध्ये 20 इंचाचा. कार लिडार आणि नॉन लिडार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल.

रेअर व्हील ड्राइव्ह सिस्टीम

'एसयू 7' आणि 'एसयू 7 मॅक्स' असे 2 व्हेरिएंट उपलब्ध करुन दिली जातील. बेस मॉडल 'एसयू 7' असेल ज्यामध्ये कंपनीने रेअर व्हील ड्राइव्ह सिस्टीम दिली आहे.

बेस मॉडेलची टॉप स्पीड किती?

बेस मॉडेल 'एसयू 7'मधील इलेक्ट्रीक मोटर 299 पीएस पॉवर जनरेट करणारी आहे. ही कार अवघ्या 5.2 सेकंदांमध्ये 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडू शकते. कारची टॉप स्पीड 210 किमी प्रति तास इतकी आहे.

रस्ता कसा आहे त्यानुसार काम

कंपनीने टॉप व्हेरिएंट 'एसयू 7 मॅक्स' अधिक दमदार बनवली आहे. यामध्ये ड्युएल मोटर ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टीम आहे. रस्ता कसा आहे त्यानुसार इंजिन काम करेल अशी सोय यात आहे.

2.7 सेकंदांमध्ये 0 ते 100 किमी

'एसयू 7 मॅक्स'मधील इलेक्ट्रीक मोटर 673 पीएस पॉवर जनरेट करणारी आहे. ही कार अवघ्या 2.7 सेकंदांमध्ये 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडू शकते. कारची टॉप स्पीड 265 किमी प्रति तास इतकी आहे.

बेस मॉडेल किती जड?

बेस मॉडेल 'एसयू 7' बेस मॉडेलचं वजन 1980 किलोग्राम इतकं आहे. लोअर ट्रिमसाठी टॉप स्पीड 210 किमी प्रति तास इतकी आहे.

टॉप मॉडेलचं वजन किती?

'एसयू 7 मॅक्स'चं वजन 2205 किलोग्राम इतकं आहे. लोअर ट्रिमसाठी टॉप स्पीड 265 किमी प्रति तास इतकी आहे.

एकदा चार्ज केल्यावर 800 किमी धावते

'एसयू 7' या बेस मॉडेलमध्ये 73.6 केडब्ल्यूची बॅटरी दिली आहे. या बॅटरीची रेंज 668 किमी इतकी आहे. तर टॉप मॉडेलमध्ये 101 केडब्ल्यूची बॅटरी असून एकदा चार्ज केल्यास ही कार 800 किमीपर्यंत प्रवास करु शकते.

VIEW ALL

Read Next Story