एलॉन मस्क यांचे जीवन त्यांच्या व्यवसाय उपक्रम आणि सार्वजनिक व्यक्तिमत्तेसाठी खूपदा चर्चेत असते.

मस्क यांच्या खासगी आयुष्याबाबतही अनेकांनाच कुतूहल वाटतं. कारण, म्हणजे त्यांच्याभोवती असणारी वलयं.

मस्क यांच्या आयुष्यातील आणखी एक लक्षवेधी पैलू अलीकडेच समोर आला आहे.

हा पैलू त्यांच्या एका Secret Child शी संबंधित आहे. टेक्नो मेकॅनिक्स असं त्यांच्या मुलाचं नाव. ज्याला प्रेमाने ताऊ म्हणूनही हाक मारली जाते.

ताऊची जन्मतारीख आणि जन्माविषयी इतर गोष्टींचा उलगडा अद्यापही झाला नसला तरीही मस्कचे हे मूल जगाचे लक्ष वेधत आहे.

ताऊ हे मस्क आणि ग्रिम्सचे पहिले मूल नाही. ताऊच्या जन्मापूर्वी, जोडप्याच्या आयुष्यात दोन बाळांचे आगमन झालं होतं.

X A E Xii ( म्हणजेच X ) ने मे 2022 मध्ये जन्म घेतला होता, तर त्यांचे दुसरे मूल, Y नावाची मुलगी, डिसेंबर 2021 मध्ये सरोगसीद्वारे जन्माला आली.

ग्रिम्सच नव्हे तर, एलॉन मस्क कॅनेडियन लेखक जस्टिन विल्सन यांच्यासोबतच्या वैवाहिक नात्यातूनही त्यांना सहा मुलं आहेत.

दरम्यान, सध्या मस्कने ट्विटरवर आपल्या या 'सिक्रेट चाईल्ड'च्या नावाचा खुलासा करताच सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

VIEW ALL

Read Next Story