सुवर्णमध्य

शांतता म्हणजे मतमतांतराचा अभाव नव्हे, तर शांतता म्हणजे मतमतांतरांमधून सुवर्णमध्य काढण्याचा एस शांततापूर्ण मार्ग, संवाद, शिक्षण आणि ज्ञान- दलाई लामा

सहनशीलता

सहनशीलता अंगी बाणवत असतााना तुमचा शत्रूच सर्वोत्तम शिक्षक असतो- दलाई लामा

नशिबाची खेळी

बऱ्याचदा जे हवं ते न मिळणं हीसुद्धा नशिबाची एक सुंदर खेळी असते- दलाई लामा

शांतता

शांतता हेच सर्व प्रश्नांचं एकमेव आणि उत्तम उत्तर आहे- दलाई लामा

खरा नायक

जो स्वत:च्या रागावर आणि घृणेवर ताबा मिळवतो तोच खरा नायक- दलाई लामा

शिकवण घ्या...

इतरांनी आनंदात राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर, दया करायला शिका. तुम्ही आनंदात राहावं असं वाटत असेल तरीही हाच गुण शिका- दलाई लामा

प्रामाणिकपणा

माझा धर्म अगदी सोपा आहे... माझा धर्म आहे प्रामाणिकपणा- दलाई लामा

प्रेम आणि करुणा

प्रेम आणि करुणा ही गरज असून त्या सुखसोयी नाहीत. त्यांच्याशिवाय माणुसकी जगूच शकत नाही- दलाई लामा

हेतू

आपल्या आयुष्याचा प्रमुख हेतू म्हणजे आनंदी राहणं- दलाई लामा

आनंद

आनंद कधीत आयता मिळत नाही, तो तुमच्या कृतींतून तयार होत असतो- दलाई लामा (सर्व छायाचित्र -https://www.dalailama.com/ )

VIEW ALL

Read Next Story