वयातील अंतर

सुखी वैवाहिक जीवनासाठी पती- पत्नीच्या वयात किती अंतर असावं?

वयाचा आकडा महत्त्वाचा?

आता तुम्ही म्हणाल, वयाचं काय लोणचं घालायचं? प्रेमाला कुठे मर्यादा असतात. अनेकांसाठीच वयाचा आकडा फारसा महत्त्वाचा नसतो.

ही चूक तुम्ही करू नका.

ही चूक तुम्ही करू नका. कारण वयही तितकंच महत्त्वाचं. सामाजिक स्तरावर हा घटक महत्त्वाची भूमिका बजावतो.

पतीचं वय

जाणकारांच्या मते पतीचं वय पत्नीहून किमान 4 ते 5 वर्षे जास्त असावं. यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत.

हार्मोनल बदल

हार्मोनल बदलांमुळे मुली/ महिला तुलनेनं लवकर वयस्कर होऊ लागतात. अशा परिस्थिती पत्नी वयानं मोठी असल्यास नात्यात विसंगती राहते.

समजुतदारपणा

एका निरीक्षणानुसार समजुतदारपणाच्या निकषासाठीही नात्यात पतीच पत्नीपेक्षा मोठा असणं फायद्याचं ठरतं.

भांडणांची शक्यता

पती- पत्नीच्या वयामध्ये अंतर असणं अपेक्षित असलं तरीही ते जास्तही नसावं. हे अंतर 8 वर्षांहून जास्त असल्यास भांडणांची शक्यता जास्त असते.

जबाबदारीची जाणीव

वयाच्या 26 व्या वर्षानंतर मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होऊ लागते. तुलनेनं मुलींना 21 व्या वर्षातच ही जाण आलेली असते.

एकमेकांचा आदर

असं म्हटलं जातं की, एकाच वयाच्या पती- पत्नीमध्ये एकमेकांचा आदर ठेवण्यावरूनही खटके उडतात.

नातं तुटतं?

एकसारख्या वयाच्या जोडप्यांमध्ये समजुतदारपणाचा अभाव अनेकदा नातं तुटण्याच्या वळणापर्यंत जाऊन पोहोचतो असंही काही निरीक्षणं सिद्ध करतात.

VIEW ALL

Read Next Story