7,561.27 किमी इतका प्रवास

तब्बल 7,561.27 किमी इतका प्रवास करत प्रत्येक हिवाळ्यात भारतात येतात 'हे' परदेशी पक्षी

पक्षी

हिवाळ्यामध्ये पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर इतका बर्फ तयार होतो की इथं लहानसा जीवही तग धरू शकत नाही. मग हे पक्षी दूरच.

उत्तर ध्रुवावरील पक्षी

हिवाळ्यामध्ये अखेर उत्तर ध्रुवावरील पक्षी तुलनेनं कमी थंड असणाऱ्या ठिकाणांवर पोहोचतात. ज्यामुळं भारतातील अनेक मैदानी भागांमध्ये हे परदेशी पक्षी या दिवसांमध्ये पाहायला मिळतात.

सायबेरियन क्रेन

परदेशातून भारतात येणाऱ्या पक्ष्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय पक्षी आहे, सायबेरियन क्रेन किंवा सारस पक्षी.

ग्रेटर फ्लेमिंगो

भारतात ग्रेटर फ्लेमिंगो पक्षीसुद्धा दरवर्षी मोठ्या संख्येनं येतात.

फ्लेमिंगो

भारतातली गुजरातच्या खाडी भागासह महाराष्ट्राच्या नवी मुंबईमध्येही फ्लेमिंगो दिसतात.

रफ

आर्क्टिकच्या रक्त आणि हाडं गोठवणाऱ्या हिवाळ्यापासून बचाव करण्यासाठी रफ पक्षीसुद्धा भारताची वाट धरतात.

नॉर्थर्न शोवेलर

उत्तर ध्रुवावरून सात हजार किलोमीटरहून जास्त प्रवास करत पुनन- घिराह किंवा नॉर्थर्न शोवेलर नावाचा पक्षीसुद्धा भारतात येतो.

पेलिकन

पेलिकन नावाचा हा पक्षी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये भारतातील तलावांपाशी आढळतो.

गॅडवाल

लहानसे बदकाच्याच प्रजातीतील गॅडवाल पक्षी उत्तर ध्रुवावर कडाक्याची थंडी पडताच भारतात येतात.

VIEW ALL

Read Next Story