स्वस्तात मस्त

परदेशवारी एकदातरी करायची असं म्हणत आपण अनेक ठिकाणं बकेट लिस्टमध्ये ठेवतो. त्यानंतर या ठिकाणी जाण्यासाठी आर्थिक गोष्टींची जुळवाजुळवही करण्याचा प्रयत्न करतो.

वाढीव दर भरावे लागणार नाही

तुम्हीही परदेशवारीसाठी उत्सुक असाल, तर काही परदेशी ठिकाणी जाण्यासाठी आता तुम्हाला वाढीव दर भरावे लागणार नाहीयेत. त्यामुळं बॅगा भरा आणि त्या उचलून तडक निघा.

अहमदाबाद ते क्वालालांपूर

अहमदाबाद ते क्वालालांपूर असा थेट विमान प्रवास तुम्ही करु शकता. मलेशिया एअरलाईन्सच्या विमानानं आठवड्यातून चार वेळा या प्रवासाची सुविधा असेल. यासाठी 18,900 इतकाच खर्च येईल.

इजिप्त

इजिप्तमधील काइरो या ठिकाणी जाऊन तिथली वेगळी दुनिया अनुभवण्याच्या विचारात तुम्ही असाल तर, इजिप्त एअर तुम्हाला ही संधी देईल. इथं थेट पोहोचण्यासाठी तुम्हाला 33000 रुपयांचं तिकीट काढावं लागेल.

तिरुवअनंतपूरमहून क्वालालांपूर

तिरुवअनंतपूरमहून क्वालालांपूरला तुम्ही आहा थेट पोहोचू शकता. या विमान प्रवासासाठी तुम्ही 8900 रुपयांचं तिकीट काढणं अपेक्षित असेल.

अमृतसरहून क्वालालांपूर

अमृतसरहून क्वालालांपूरला जाण्यासाठी तुम्ही एअरएशियाच्या फ्लाईटनं प्रवास करु शकता. आठवड्यातून चार वेळा हा प्रवास करता येतो. विश्वास बसणार नाही पण, या तिकीटाची सुरुवात 6000 रुपयांपासून होते. बंगळुरूपासून म्युनिकपर्यंतचा प्रवासही तुम्ही करु शकता. हे जगातील एक सुंदर शहक आहे. भारतातून इथं थेट विमानानं पोहोचण्याची मुभा आहे. या प्रवासाची तिकीट 31900 रुपये इतकी आहे.

VIEW ALL

Read Next Story