यंदाच्या मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद यवतमाळला

तब्बल ४५ वर्षांनंतर यवतमाळकडे संमेलनाचे यजमानपद

Updated: Sep 9, 2018, 07:26 PM IST
यंदाच्या मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद यवतमाळला

पुणे: अखिल भारतीय साहित्य महामंडळाने ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये भरविण्याचे निश्चित केले.  संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची धुरा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.  

 मराठी साहित्यसृष्टीला यवतमाळच्या मातीमधील अनेक साहित्यिकांनी योगदान दिले आहे. या पार्श्वभूमीवरच साहित्य महामंडळाने ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये भरविण्याचे निश्चित केले. तब्बल ४५ वर्षांनंतर असे संमेलन भरविण्याची संधी यवतमाळकरांना लाभली आहे. तीन दिवसांचे हे संमेलन मराठी साहित्यातील विविधतेने नटलेले असेल, असा दावा आयोजकांनी केला आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close