धक्कादायक! पुण्यातील 'या' आमदाराच्या खुनाचा कट पोलिसांनी उधळला

काही पत्रकारांना मोबाईलवर मेसेज पाठवण्यात आले होते.

Updated: Oct 1, 2018, 11:16 PM IST
धक्कादायक! पुण्यातील 'या' आमदाराच्या खुनाचा कट पोलिसांनी उधळला title=

पुणे: पुण्याच्या दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांच्या खुनाचा कट आखण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार असलेल्या राहुल कुल यांच्या गाडीचा अपघात घडवून आणण्याचा कट आखण्यात आला होता. 

राहुल कुल यांनीही 'झी २४ तास'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी माझे कार्यकर्ते, पोलीस आणि काही पत्रकारांना मोबाईलवर मेसेज पाठवण्यात आले होते. यामध्ये माझ्या हत्येचा कट आखण्यात आल्याचा उल्लेख होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु करत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस सध्या या दोघांची कसून चौकशी करत आहे. येत्या काही दिवसांत याबाबतची माहिती पुढे येईल, असे राहुल कुल यांनी सांगितले.