पुण्यात जाळीत कांडात दहा दुचाकी खाक

या जाळीत कांडात दहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. 

Updated: Nov 3, 2017, 10:48 PM IST

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा गाड्या जाळण्याचा प्रकार घडला आहे. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र मंडळाच्या जवळील गल्लीत हा प्रकार घडला. या जाळीत कांडात दहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. 

रात्री तिनच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. रात्रीच आग विझवण्यात आली असून आगीच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पेट्रोल चोरी किंवा पूर्व वैमस्यातून आग लावली गेली असावी.

असा संशय नागरिक वयकत करत आहेत. दिवाळी - दसऱ्याला घेतलेल्या नवीन गाड्या देखील आगीत जळून खाक झाल्या.