पुणे विद्यापीठाने अभ्यासक्रमातून डीएसकेंचा धडा वगळला

डीएसकेंवरील या प्रकरणाचा वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमात समावेश केला होता.

Updated: Sep 3, 2018, 08:32 PM IST
पुणे विद्यापीठाने अभ्यासक्रमातून डीएसकेंचा धडा वगळला title=

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातील उद्योजक डी.एस. कुलकर्णी यांच्यावरील धडा वगळण्यात आला आहे. विद्यापीठाने परिपत्रक काढून याबद्दलची माहिती दिली. वाणिज्य शाखेतील पहिल्या आणि तिसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमातून डीएस कुलकर्णी यांच्या कारकिर्दीवर आधारित धडा होता.
 
यशोगाथा या पुस्तकात डीएसकेंवर एक प्रकरण आहे. या प्रकरणात डीएसकेंचा संघर्ष, यश, प्रेरणा याचा समावेश आहे. २०१३ मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले. प्रा.प्र.चिं.शेजवलकर याचे लेखक असून त्यांनी या पुस्तकात समाजातील आणखी काही प्रतिष्ठित आणि प्रेरणादायी व्यक्तींवर लिहिले आहे. पुणे विद्यापीठाने डीएसकेंवरील या प्रकरणाचा वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमात समावेश केला होता.
  
 आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली सध्या डीएसके तुरुंगात आहेत. त्यांच्यावर गुंतवणूकदारांचे पैसे बुडवल्याचा डीएसकेंवर आरोप आहे.