West Maharashtra News

पुण्यात शिक्षकांचा पालिकेवर मोर्चा आंदोलन

पुण्यात शिक्षकांचा पालिकेवर मोर्चा आंदोलन

'समान काम समान वेतन' च्या मागणीसाठी पुण्यातील हंगामी शिक्षकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

 फिल्मी स्टाइलने पाठलाग करून अवैध दारू करणारी गाडी ताब्यात

फिल्मी स्टाइलने पाठलाग करून अवैध दारू करणारी गाडी ताब्यात

राज्यात हायवे वरील दारु बंद झाल्या नंतर  मोठया प्रमाणात अवैध्य रीत्या दारुची विक्री आणि वाहतूक होतांना आढळून येतय. आज संगमनेर पोलीसांनी सिने स्टाईल पाठलाग करत अवैध्य दारू विक्री करणारी एक स्कॉर्पिओ गाडी पकडली आहे. ही गाडी पळून जात असतांना गाडीचा अपघातही झाला असून यात चार जण जखमी झालेत तर पोलीसांनी अवैध्य दारू वाहतूक करणा-या दोघांना ताब्यात घेतल आहे. 

बॉन्ड्स घ्या बॉन्ड्स पुणे महापालिकेचे बॉन्ड्स...

बॉन्ड्स घ्या बॉन्ड्स पुणे महापालिकेचे बॉन्ड्स...

विकासकामं मार्गी लावण्यासाठी पुणे महापालिकेन एक पाऊल पुढं टाकलं आहे. विकासकामांना निधी उभारण्यासाठी महापालिका म्युनिसिपल बॉण्ड्स भांडवल बाजारात आणणार आहे. म्युनिसिपल बॉण्ड्स मधून पुणे महापालिका बाविशे कोटी रुपये उभारणार आहे. त्यामुळं, बाँड्सच्या विक्रीतून निधी उभारणारी पुणे देशातील पहिली महापालिका ठरणार आहे. 

 शेअर मार्केटला पुणे महापालिकेचे बॉण्ड लिस्टिंग

शेअर मार्केटला पुणे महापालिकेचे बॉण्ड लिस्टिंग

भारतीय शेअर बाजाराच्या इतिहास पहिल्यांदाच एखाद्या महापालिकेचे कर्जरोखे खरेदी विक्रीसाठी खुले झाले आहेत.

पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढणार, पवना धरणात २१.२२ टक्के पाणीसाठा

पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढणार, पवना धरणात २१.२२ टक्के पाणीसाठा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात केवळ २१.२२ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

कर्जरोख्यांमुळे पहिल्याच दिवशी पुणे महापालिकेच्या तिजोरीत २०० कोटी

कर्जरोख्यांमुळे पहिल्याच दिवशी पुणे महापालिकेच्या तिजोरीत २०० कोटी

पुणे महापालिकेने २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोखे आणले आहेत.

कोल्हापुरातील अख्ख्य गाव झालंय 'लागिरं'

कोल्हापुरातील अख्ख्य गाव झालंय 'लागिरं'

झी टीव्हीवरील अल्पवधीच लोकप्रिय झालेली 'लागिरं झालं जी' ही मालिका तुम्ही पाहत असणार. पण कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका अख्ख्या गावाचीच अवस्था लागिरं झालं जी, अशी झालीय.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातले पुजारी हटवण्याची मागणी

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातले पुजारी हटवण्याची मागणी

अंबाबाई मंदिरातले पुजारी हटावण्याच्या मागणीसाठी उद्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर बैठक होणार आहे. 

'छत्रपतींची गोब्राह्मण प्रतिपालक ही प्रतिमा खोटी'

'छत्रपतींची गोब्राह्मण प्रतिपालक ही प्रतिमा खोटी'

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय.  

ठाण्यात रिक्षाचालकांची मुजोरी, प्रवाशाला बदडले

ठाण्यात रिक्षाचालकांची मुजोरी, प्रवाशाला बदडले

 शहरात रिक्षाचालकाची पुन्हा एकदा मुजोरी पाहायला मिळाली. प्रवाशाकडे दोन रुपये कमी होते म्हणून प्रवाशाला रिक्षाचालकानं बदडलं. मात्र हे पाहून इतर नागरिकांनी रिक्षाचालकाला चोप दिला आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेला.

फसवणूक : ठाण्यात पुन्हा नवीन चिप पल्सरचा शोध

फसवणूक : ठाण्यात पुन्हा नवीन चिप पल्सरचा शोध

ठाणे पोलिसांनी गेल्या एक महिन्यांपासून पाळत ठेवून दोन पेट्रोल पंपावर कारवाई केली होती. उत्तर प्रदेशमधील चिपचा वापर करून ग्राहकांच्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा नवीन चिप पल्सरचा शोध ठाणे गुन्हे शाखेने लावला. 

व्हिडीओ कॉल करुन प्रियकराची आत्महत्या, तरुणीवर गुन्हा

व्हिडीओ कॉल करुन प्रियकराची आत्महत्या, तरुणीवर गुन्हा

प्रेम प्रकरण तुटल्यानंतर आणि  घरच्यांनी दोघांचे लग्न वेगवेगळ्या ठिकाणी ठरवल्यावर उल्हासनगरातील तरूणाने प्रेमिकेला व्हिडीओ कॉल करुन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

 मेट्रो गेली खड्ड्यात, नगरसेवक मोबाईलवर खेळण्यात गुंग...

मेट्रो गेली खड्ड्यात, नगरसेवक मोबाईलवर खेळण्यात गुंग...

शहराच्या विकासाशी प्रशासकीय अधिका-यांना काही घेणंदेणं आहे की नाही असा प्रश्न पडावा असं पिंपरी चिंचवडमध्ये घडलंय. 

पुणे महापालिका कर्जरोख्यांवर गुंतवणूकदारांच्या उड्या

पुणे महापालिका कर्जरोख्यांवर गुंतवणूकदारांच्या उड्या

२४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी पुणे महापालिकेने बाजारात आणलेल्या बॉण्ड अर्थात कर्जरोख्यांवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहेत. शेअर बाजारात सोमवारी लावण्यात आलेल्या ऑनलाईन बोलीमध्ये या कर्जरोख्यांना २१ गुंतवणूकदारांनी मागणी नोंदवली.

कोल्हापूर पालिका सभागृहात सत्ताधारी-विरोधकांत राडा

कोल्हापूर पालिका सभागृहात सत्ताधारी-विरोधकांत राडा

महापालिकेच्या सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाला. त्यामुळे पालिकेत तणावपूर्ण वातावरण होते.

मुख्यमंत्री फडणवीस 'ब्लॅकमेलर' - पृथ्वीराज चव्हाण

मुख्यमंत्री फडणवीस 'ब्लॅकमेलर' - पृथ्वीराज चव्हाण

'माझ्याकडे फाईल्स आहेत असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी नेत्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा' धक्कादायक आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

इथं दारुबंदीचा निर्णय लागूच होत नाही कारण...

इथं दारुबंदीचा निर्णय लागूच होत नाही कारण...

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून ५०० मीटरच्या आत असलेल्या हॉटेल्समधून मद्य विक्रीला सर्व्वोच्च न्यायलयाने बंदी घातल्यानतंर, महामार्गालगतची दारुची दुकानं बंद झाली आहेत. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नकाशात, राज्य महामार्ग हा उल्लेख नसून राज्यमार्ग उल्लेख आहे. त्यामुळे दारु बंदीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत पेच निर्माण झालाय.

संभाजी भिडे गुरुजींसह १००० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

संभाजी भिडे गुरुजींसह १००० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पालखी सोहळ्यादरम्यान बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी सांगलीच्या शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे गुरुजींसह त्यांच्या सुमारे १००० कार्यकर्त्यांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ज्योती कुमारी बालात्कार आणि खून प्रकरण: आरोपींची दया याचिका राष्ट्रपतीनी फेटाळली

ज्योती कुमारी बालात्कार आणि खून प्रकरण: आरोपींची दया याचिका राष्ट्रपतीनी फेटाळली

पुण्यातील बीपीओ कर्मचारी ज्योती कुमारी चौधरी बालात्कार आणि खून प्रकरणातील आरोपींची दया याचिका राष्ट्रपतीनी फेटाळली आहे. मुळची उत्तर प्रदेशातील असलेली ज्योतीकुमारी विप्रो बीपीओमध्ये कामाला होती. १ नोव्हेंबर २००७ रोजी संध्याकाळी कामावर जाण्यासाठी निघाली असताना तिचा कॅबचालक पुरुषोत्तम बोराटे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकडे यांनी तिचं अपहरण केलं. त्यानंतर त्यांनी तिच्यावर गहुंजे परिसरात बलात्कार करून तिचा खून केला होता. या प्रकरणातील आरोपींना पुणे जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

पुण्याच्या स्मार्ट सिटीच्या कामावर असमाधानी - पालकमंत्री गिरीश बापट

पुण्याच्या स्मार्ट सिटीच्या कामावर असमाधानी - पालकमंत्री गिरीश बापट

पुण्याच्या स्मार्ट सिटीच्या कामावर समाधानी नाही अशी प्रतिक्रिया देत पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे महापालिकेला घरचा आहेर दिला आहे. पुणे स्मार्ट सीटीच्या विविध प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आलं होतं. त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, यातील कुठलीच कामं सुरु झाली नाहीत.

कोर्टाच्या बंदीनंतरही वाईन शॉप सुरु करण्याची पुणेकरांची आयडिया!

कोर्टाच्या बंदीनंतरही वाईन शॉप सुरु करण्याची पुणेकरांची आयडिया!

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने बंद झालेली पुणे शहरातली वाईन शॉप्स आणि परमिट रूम सुरू होणार आहेत.