लग्नानंतर महिलेची जात बदलत नाही - सर्वोच्च न्यायालय

लग्नानंतर आपली जात बदली आहे, असा दावा एका महिलेकडून करण्यात आला होता. नोकरीच्या प्रश्नावरुन जातीचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी ही महिला सर्वोच्च न्यायालयात गेली होती. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, लग्नानंतही महिलेची तिच जात राहते. त्यात बदल होत नाही.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 20, 2018, 10:29 PM IST
लग्नानंतर महिलेची जात बदलत नाही - सर्वोच्च न्यायालय title=

नवी दिल्ली : लग्नानंतर आपली जात बदली आहे, असा दावा एका महिलेकडून करण्यात आला होता. नोकरीच्या प्रश्नावरुन जातीचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी ही महिला सर्वोच्च न्यायालयात गेली होती. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, लग्नानंतही महिलेची तिच जात राहते. त्यात बदल होत नाही.

या महिलेने आंतरजातीय विवाह केला होता. नोकरीच्यावेळी जातीचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर हा वाद निर्माण झाला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. यावेळी सुनावणीत न्यायालयाने म्हटले, आंतरजातीय जरी झाले तरी लग्नानंतर महिलेची जात बदलत नाही. त्यामुळे लग्नानंतर मुलीची जात बदलत असल्याचा समज आता चुकीचा ठरणार आहे.

मुलगी ज्या घरात जन्माला येते अखेरपर्यंत ती त्याच जातीची राहते, असेही न्यायालयाने सांगितले. बुलंदशहरमधील एका महिलेने याबाबत याचिका दाखल केली होती. संबंधित महिला २१ वर्षांपूर्वी एका केंद्रीय विद्यालयात शिक्षिका म्हणून नोकरीला लागली होती. मात्र, हे पद तिने मागासवर्गीय कोट्यातून मिळवले होते. मात्र, तिचा जन्म सर्वसाधारण प्रवर्गात झाल्याचे समोर आल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिची नियुक्ती रद्द केली होती. 

या शिक्षिकेने न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. पती मागासवर्गीय समाजातील असल्याने लग्नानंतर आपणही त्याच जातीचे झाल्याचे तिने सांगितले. मात्र, न्यायमूर्ती एम. एम. शंतनागौदर आणि अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने तिचा दावा खोडून काढत हा निर्णय दिला.