उन्हाळ्यातील सहलींमध्ये 'कूल' आणि 'स्टाईलिश' ठेवतील हे फॅशन फंडे

एप्रिल महिना सुरु झाला की सर्वांचे कुठे ना कुठे फिरण्याचे प्लॅन बनू लागतात. 

Updated: Mar 27, 2018, 05:37 PM IST
उन्हाळ्यातील सहलींमध्ये 'कूल' आणि 'स्टाईलिश' ठेवतील हे फॅशन फंडे

मुंबई : एप्रिल महिना सुरु झाला की सर्वांचे कुठे ना कुठे फिरण्याचे प्लॅन बनू लागतात. वेगवेगळ्या लोकेशन्स पासून ते कोण कोण गॅंगमध्ये सामील होणार याची यादी बनवली जाते. आजकाल सर्वांना आपल्या सोशल मीडियामध्ये अपडेटेड राहण्यास आवडतं. आपल्या सोशल मीडियावर सर्वात कूल आपलेच फोटो असावे असे सर्वानाच वाटते. म्हणूनच आजच्या तरूणाईसाठी ड्रेसिंग हा ट्रिपचा सर्वात मोठा आणि महत्वाचा भाग ठरत आहे.

 गॅंगमध्ये आपला लूक सर्वात हटके असावा यासाठी यंगस्टर्स आटापिटा करत असतात. कूल म्हणजे काहीतरी फंकी अडकवून स्टाईल स्टेटमेंट बनत नाही, तर त्यासाठी तसा ड्रेसिंग सेन्सही असावा लागतो. याव्यतिरिक्त प्रत्येकजण सध्या कोणत्याही सेलिब्रिटी, किंवा त्यांचे आयडॉल तसेच निवडक डिझायनर्सला फॉलो करत असतात. अशाच काही उन्हाळ्यातील कूल ड्रेसिंग स्टाईल्स जाणून घेऊयात स्पायकर इंडियाच्या समर कलेक्शनमधून. 

पेस्टल :

जर तुमचा कोणत्या तरी बीचवर जाण्याचा प्लॅन असेल तर पेस्टल कलर हा ऑप्शन तुमच्यासाठी योग्य असेल. अगदी हलक्या रंगाचे हे कपडे गरम वातावरणातही एकदम "कुल" लूक देऊन जातात. त्यात यावर फ्लोरल प्रिंट, एखादी छानशी हॅट आणि कुल एविएटर सनग्लासेस एकदम झक्कास दिसतील.  

 
कॅमोफ्लॉज :

काही ट्रॅव्हलर्सना बीच ट्रीपच्याऐवजी ट्रेकिंग किंवा अ‍ॅडव्हेंचर ट्रिप्सला जाण्यासाठी अधिक उत्सुकता असते. त्यांच्यासाठी खास कॅमोफ्लॉज प्रिंटचे कपडे डिझाईन परफेक्ट आहेत. मिलिटरी प्रिंट्सचे हे आऊटफिट तुम्हाला तुमच्या हटके डेस्टिनेशनला व ट्रिपला "राऊडी" लूक देतील. 
 

फंकी चेक्स :

चेक्स हा तर सर्वांचाच “एनी टाईम फेव्हरेट" ड्रेसिंग स्टाईल आहे. समर ट्रिपमध्ये चेक्स टॉप किंवा चेक्स शर्टसोबत कलर डेनिम हा हटके पर्याय आहे. एखादा गडद रंगाचा चेक्स शर्ट समरमध्ये तुम्हाला सेंटर ऑफ अट्रॅक्शनचा फिल देईल.

डेनिम :

स्पायकर इंडिया डेनिमसाठी प्रसिद्ध आहेत. समर कलेक्शनमध्ये मुलींसाठी खूप ऑप्शन आहेत, जसे कि एखाद्या गडद डेनिम सोबतच लाईट रंगाचा डेनिम शर्ट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डेनिम टॉप्स आणि वन-पीस असे बेस्ट ऑप्शन ट्रिपसाठी उपलब्ध आहेत.
 
ज्या ठिकाणी आपण ट्रिपला जात आहोत त्याप्रकारचे ड्रेसिंग करणे हे सर्वात महत्वाचे आहे. मग यंदा तुमच्या ट्रीपसोबत तुमचे  कपडेही सिलेक्ट करायला विसरू नका. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close