मार्क झकरबर्गलाही या तरुणीने टाकले मागे, २० व्या वर्षीच अब्जाधीश

मार्क झुकरबर्गला एका २० वर्षीय सुंदर तरुणीने मागे टाकलेय. 

Surendra Gangan Updated: Jul 12, 2018, 06:54 PM IST
मार्क झकरबर्गलाही या तरुणीने टाकले मागे, २० व्या वर्षीच अब्जाधीश
छाया - @KylieJenner ट्विटर वॉल

लंडन : फेसबुकचा निर्माता आणि सीईओ मार्क झुकरबर्ग हा जगातील एक श्रीमंत व्यक्ती. २३ व्या वर्षी अब्जाधीश होण्याचा मान पटकावला होता. मात्र, मार्कला एका २० वर्षीय सुंदर तरुणीने मागे टाकलेय. वयाच्या विसाव्या वर्षी ती अब्जाधीश झालेय. तिची संपत्ती ६१ अब्ज ७४ कोटींच्या घरात आहे.

, मार्क झुकरबर्ग मागे टाकणाऱ्या तरुणीचे नाव आहे केली जेनर. केली ही मॉडेल, अभिनेत्री किम कार्दाशिअन हिची सावत्र बहीण आहे. केलीची सध्याची संपत्ती ही ६१ अब्ज ७४ कोटींच्या घरात आहे. केली जेनर ही वयाच्या २० व्या वर्षीच अब्जाधीश होण्याचा मान पटकावलाय. आतापर्यंत मार्क हा सर्वात कमी वयात अब्जाधीश झाला होता.

‘केली कॉस्मेटिक्स’या प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन कंपनीची ती सम्राज्ञी आहे. ओठांना अधिक आकर्षक करण्यासाठीची सौंदर्यप्रसाधनं ही कंपनी तयार करते. विशेष म्हणजे केली स्वत: तिच्या ओठांसाठी प्रसिद्ध आहे. केलीची सध्याची संपत्ती ही ६१ अब्ज ७४ कोटींच्या घरात असल्याचे ‘फोर्ब्स’ मासिकानं म्हटले आहे. तर ‘केली कॉस्मेटिक्स’कंपनीचं एकूण बाजारमूल्य हे ५४ अब्जांच्या घरात आहे.

दोन वर्षांपूर्वी केलीने ही कंपनी सुरु केली आहे. अभिनेत्री किमची बहीण असल्याने केली ही प्रसिद्ध होतीच, मात्र या कंपनीने तिला अधिक प्रसिद्धी मिळवून दिली. ‘फोर्ब्स’नं नुकतीच अमेरिकेतील ‘self-made US billionaire’ची यादी जाहीर केली. यात केली १९ व्या स्थानावर आहे. याआधी मार्क झकरबर्ग वयाच्या २३ व्या वर्षी अब्जाधीश झाला होता.  

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close