फॅशन विश्वाची आयकॉन केट मिडल्टन

राजघराण्यातील सुनांचा थाट काही निराळाच असतो. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 12, 2018, 05:16 PM IST
 फॅशन विश्वाची आयकॉन केट मिडल्टन

मुंबई : राजघराण्यातील सुनांचा थाट काही निराळाच असतो. 

त्या सगळ्या निळ्या आणि भु-या डोळ्यांच्या, गो-यागो-या पान, लांब लांब झगे घातलेल्या, त्यांचं राहणं, वावरणं सगळं काही शाही एकदम शाही थाटाचं, एकाद्या परीसारखंच..आम्ही बोलतोय इंग्लंडमधल्या राजघराण्यातल्या सूनांबद्दल. बकिंगहॅम पॅलेसमध्ये आता नवी सून येणार आहे. हे इंग्लंडचं राजघराणं परंपरेसाठी अगदीच काटेकोर. या राजघराण्यात घटस्फोटीत महिला चालत नाहीत, मिश्रवर्णाच्या महिलांना या राजघराण्यात सून म्हणून प्रवेश नसतो.  पण हे सगळं मोडीत काढलंय मेघन मर्कलनं.

कशी आहे ही साधी आणि सरळ पण बंडखोर मुलगी मेघन मर्कल.......

ती रुढार्थाने सुंदर नाही. त्यात ती मिश्रवर्णीय. आई कृष्णवर्णीय तर वडिल डच. तिच्यावर आता जगभरातून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होतोय. कारण ती आता राजघराण्याची सून होणार आहे. प्रिन्स हँरीची पत्नी म्हणून ती १९ मे ला बंकिंगहँम पॅलेसमध्ये प्रवेश करेल. मेगन मर्केल,मॉडेल, हॉलिवूडची अभिनेत्री आणि स्टायलिस्ट.

वयाच्या ६ व्या वर्षी आपल्या आईवडिलांना विभक्त होताना पाहिलेली मेगन स्वतः घटस्फोटिता आहे... आयुष्यात अनेक चढ उतार पाहिलेल्या मेगनच्या आयुष्यात आता एक राजकुमार आलाय. त्या राजकुमारासोबत उर्वरित आयुष्याची सुरुवात ती करणार आहे. मेघन मर्केल स्वताच्या ताकदीवर मिळवलेली ओळख. ही ओळख तीला सहजासहजी मिळालेली नाही. परिस्थितीशी आणि समाजाशी तिला झगडावं लागलं. आयुष्यात काही गोष्टी मिळवण्यासाठी झगडण्याशिवाय पर्याय नसतो, या मतावर मेघन ठाम आहे. हे सर्व ती अनुभवावरुन बोलतेय. मिश्र वर्णीय असल्याने चित्रपटात भूमिका मिळवताना अनेक अडचणींचा, टोमण्यांचा सामना तिने केला.

स्त्री पुरुष समानतेसाठी वयाच्या ११ व्या वर्षापासून मेगन झगडतेय. त्यावेळी एका सोप कंपनीची टॅगलाईन होती. चिकट भांड्यांशी झगडणा-या तमाम महिलांसाठी. त्यावेळी भांडी घासण्याचं काम हे महिलांचंच असतं, असं तिच्या वर्गातली मुलं म्हणाली. मेगन प्रचंड चिडली. तिनं जाहिरात कंपनीला पत्र लिहिलं. त्यावेळची अमेरिकेची फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटननाही पत्र लिहिलं. हिलरी क्लिंटननी तिच्या पत्राची दखल घेतली.  त्या साबणाच्या कंपनीनंही मेगनच्या पत्राची दखल घेतली आणि त्यांची कॅचलाईन बदलली. मेघनवर तिच्या आईचा प्रभाव जास्त आहे. आईने आपल्याला एक “ग्लोबल सिटीझन” बनण्यासाठी घडवले असं ती अभिमानाने सांगते.

मेघन आणि हॅरी या दोघांमधला समान दुवा म्हणजे आई. मेघनप्रमाणेच हॅरीचं त्याची आई डायनावर प्रचंड प्रेम.  प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांचा घटस्फोट झाल्यानंतर हॅरी आईपासून दुरावला आणि प्रिन्सेस डायनाने राजवाडा सोडला. १९९७ मध्ये पापाराझ्झी पासून पळताना कार अपघातात प्रिन्सेस डायनाचा म्हणजेच हॅरीच्या आईचा मृत्यू झाला. हॅरी तेव्हा १२ वर्षांचा होता. वडिलांचा दुसरा विवाह मान्य नसणारा प्रिन्स आईच्या मृत्यूनंतर एकाकी पडला. मग त्याचा मोठा भाऊ प्रिन्स विलियम्स त्याचा मित्र झाला, आणि हॅरी सावरलं.   राजवाड्यात घुसमट सोसणा-या हॅरीच्या आयुष्यात आता त्याला सावरायला मेघन आलीय....

मेघन आणि हॅरीची ओळख २०१६ ला झाली. काही महिने एकमेकांच्या सहवासात घालवल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अर्थात २७ नोव्हेंबरला ही घोषणा बंकिंगहॅम पॅलेसवरुन कऱण्यात आली. हॅरीने मेघनला घातलेल्या साखरपुड्याच्या अंगठीत दोन स्पेशल हिरे आहेत...हे हिरे आहेत त्याच्या आईच्या म्हणजे प्रिन्सेस डायनाच्या ज्वेलरी कलेक्शनमधले...”  आई असती तर मेघनची खूप छान मैत्रिण झाली असती...माझ्या लग्नाची बातमी ऐकून तिने उड्या मारल्या असत्या” ...प्रिन्स त्याच्या आईविषयी भरभरुन बोलत

प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स विल्यम्सची आई डायना म्हणजे अपरिमित सौंदर्य.. आपल्या दोन मुलांवर तिचं खूप प्रेम.. तिच्या दोन्ही सुना केट मिडल्टन आणि मेघन तिच्याविषय़ी आदराने बोलतात. केट मिडल्टन आता राजवाड्यातील वातावरणाला सरावलीय. स्त्रीपुरुष समानतेवर गाढ विश्वास असणा-या मेघनचा राजवाड्यातला अधिकृत प्रवेश अजून व्हायचाय...बाहेरुन प्रशस्त दिसणारा हा राजवाडा कितीतरी अनुभवांचा साक्षीदार असेल. ज्या राजवाड्याच हॅरीची घुसमट झाली तो राजवाडाही कितीतरी गोष्टी मेघनला सांगण्यासाठी आतुरही असेल... राणी एलिझाबेथ आज राजवाड्याच्या सर्वोच्च स्थानी आहेत. हा राजवाडा राणीच्या शब्दाबाहेर नाही.

राजशिष्टाचाराप्रमाणे मेघनच्या आयुष्य आता राजवाड्याभोवती बांधलं गेलंय... मेघन आता तिच्या चाहत्यांना चित्रपटात दिसणार नाही. कारण..राजघराण्यातील महिला अभिनय करत नाहीत.तिने सोशल नेटवर्किंग वरील सर्व खाती बंद केली... फेसबुक ,इस्टांग्राम, ब्लॉग...आपल्या आयुष्यातील आनंद छोट्या सेल्फीमधूनही शोधणारी...तरुणांना प्रेरणादायी गोष्टी सांगणारी...ब्लॉगवरुन फॅशनचे धडे देणा-या मेघनला राजशिष्टाचाराचा मान राखत हे सगळं करावं लागलं. स्त्री पुरुष समानता आणि महिलांना सशक्त करण्यासाठी लढणारी ही कार्यकर्ती आता राजघराण्याची सून होणार आहे..... बंड मान्य नसणारा हा जगातला सर्वात मोठा राजवाडा मेघनची आतुरतेने वाट पाहातोय...कॉलेजमध्ये मैत्रिणींसोबत फिरायला आलेल्या मेघनला तर त्या राजवाड्याने तेव्हाच साद दिली होती...जेव्हा कुतुहलापोटी राजवाड्याबाहेरुन तीने स्वतचा फोटो काढला होता...  याच राजवाड्याचा उंबरठा ती १९ मे ला ओलांडेल...
 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close