परीक्षा देतानाच बाळाला दूध पाजतेय ही आई, फोटो व्हायरल

अफगाणिस्तानच्या निली शहरात परीक्षा देणाऱ्या महिलेचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटो परीक्षा देणारी महिला आपल्या बाळाला ब्रेस्टफिडिंग करतेय. हा फोटो अफगाणिस्तानच्या एका विद्यापिठाच्या प्रवेश परीक्षे दरम्यानचा आहे.

Updated: Mar 23, 2018, 01:26 PM IST
 परीक्षा देतानाच बाळाला दूध पाजतेय ही आई, फोटो व्हायरल

नवी दिल्ली : अफगाणिस्तानच्या निली शहरात परीक्षा देणाऱ्या महिलेचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटो परीक्षा देणारी महिला आपल्या बाळाला ब्रेस्टफिडिंग करतेय. हा फोटो अफगाणिस्तानच्या एका विद्यापिठाच्या प्रवेश परीक्षे दरम्यानचा आहे.

ब्रेस्टफीडिंग 

 जहा ताब असे या महिलेचं नाव असून ती विद्यापीठाची प्रवेश परीक्षा देत आहे. याला कांकोर परीक्षा म्हटले जाते. परीक्षा देत असतानाच २ महिन्याच बाळ रडायला लागल. ज्यानंतर ती जमिनिवर बसली आणि बाळाला अंगावर घेत परीक्षा देऊ लागली. 

स्टाफने काढला फोटो

दरम्यान विद्यापीठातील एका स्टाफने हा फोटो क्लीक केला. जेव्हा ताब परीक्षा द्यायला आली तेव्हा तिचं बाळ रडू लागलं. त्यानंतर ती खाली बसली. हा फोटो प्रेरणा देणारा आहे. 

प्रवेश घ्यायला पैसे नाहीत 

 सीएनएनच्या वृत्तानुसार, ताबला ३ मुलं आहेत. निली या शहरात येईपर्यंत तिला ६ ते ८ तास लागतात. १५२ गुण मिळवत तिने ही परीक्षा पास केल्याचेही वृत्त आहे.

तिला समाज विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचाय. तिचे लग्न एका शेतकऱ्यसोबत झालय. 

तिच्याकडे प्रवेश घेण्यासाठीही पुरेसे पैसे नसल्याचे वृत्त आहे. 'गो फंड' नावाच्या ब्रिटीश संस्थेने पैसे गोळा करण्यासाठी अभियान सुरू केलयं.  
 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close