मदर्स डे : या ५ सोप्या गोष्टी आपल्या आईसाठी नक्की करा

आपली आई आनंदी रहावी अस तुम्हाला वाटत असेल तर या पाच गोष्टी नक्की अंमलात आणा. 

Updated: May 13, 2018, 12:01 PM IST
मदर्स डे :  या ५ सोप्या गोष्टी आपल्या आईसाठी नक्की करा
मुंबई : खरंतर वर्षाचे सर्वच दिवस मदर्स डे असतात. त्यामुळे आईसाठी कोणता विशिष्ट दिवस असा नसतो. पण आज जगभरात मदर्स डे साजरा केला जातोय तर या निमित्ताने आईला आवडणाऱ्या गोष्टींवर चर्चा व्हायलाच हवी. आईला पैसे दिले ती आनंदीत होते असा अनेक मुलांचा मोठा गैरसमज असतो. तसा हिशोब करायला गेलात तर तुम्हाला आयुष्यही कमी पडेल. तुम्ही सुखी, आनंदित राहण्यापेक्षा आईला दुसर काही नको असत. आपली आई आनंदी रहावी अस तुम्हाला वाटत असेल तर या पाच गोष्टी नक्की अंमलात आणा. 

स्वावलंबी व्हा

तुम्ही मोठे झाला आहात तर स्वत:ची काळजी स्वत: घेऊ शकता. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आईवर अवलंबून राहण चुकीच आहे. आपले कपडे, वस्तू यांची काळजी स्वत: घ्यायला हवी. 

कामात मदत 

आई जर घरातल कोणत काम करतेय तर ते याचा अर्थ ते तिच काम आहे असा होत नाही. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून ती काम आवरत असते. त्यामुळे तुम्ही देखील तिची त्या कामात मदत करायला हवी. शक्य असेल तेव्हा किचन मध्ये मदत करु शकता 

आईला सुट्टी 

आपण सर्वजण ऑफिसमधून १ किंवा २ दिवस सुट्टी घेतो पण आईला ही सुट्टी मिळते का ? कधीच नाही. खूप मस्त वाटेल जेव्हा परिवार मिळून आईला सुट्टी देईल. 

हाकेला धावा 

जेव्हा आई हाक मारेल तेव्हा लगेच पोहोचा. जर तिला मदतीची गरज नसेल तर ती विनाकारत तुम्हाला हाक मारून डिस्टर्ब करणार नाही हे लक्षात घ्या. 

फिरायला जा 

जेवण झाल्यावर आपल ताट धुवून ठेवा. ही छोटी पण कामाची गोष्ट आहे. यामुळे तुम्ही कळतनकळत आईला मदत करत असता.  शक्य असेल तेव्हा आईला घेऊन फिरायला जा. आईने आपल कर्तव्य केलय आता तुमची वेळ आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close