या बॉडीपार्ट्सवर लावा पर्फ्यूम, सुंगध दिवसभर दरवळेल

 शरीराच्या कोणच्या भागात पर्फ्यूम लावल्याने जास्त काळ सुगंध राहतो हे जाणून घेऊया... 

Updated: Jul 23, 2018, 09:34 AM IST
या बॉडीपार्ट्सवर लावा पर्फ्यूम, सुंगध दिवसभर दरवळेल

मुंबई : महागडा पर्फ्यूम लावूनही सुगंध जास्त काळ टिकत नसल्याची अनेकांची तक्रार असते. पण केवळ महागडे पर्फ्यूमच जास्त सुगंध देतात असं नाही.  पर्फ्यूम लावताना बॉडीपार्ट्सचेही महत्व असते. शरीरातील काही भागात पर्फ्यूम लावल्याने सुगंध जास्त काळ टिकतो. कारण शरीरातील या भागातून गरमी बाहेर पडते आणि सुगंध देत राहते. शरीराच्या कोणच्या भागात पर्फ्यूम लावल्याने जास्त काळ सुगंध राहतो हे जाणून घेऊया... 

नाभी

नाभी हा शरीराच्या गरम भागांपैकी एक मानला जातो. इथे पर्फ्यूम लावल्यास तो जास्त वेळ दरवळत राहतो. मी नाभीवर पर्फ्यूम लावते असे अमेरिकेची टीव्ही अभिनेत्री लिव टाइलरने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. मी काही थेंब बोटांवर घेते आणि काही अंडरगार्म्स आणि नाभितही असेही तिने यावेळी सांगितले. 

केसांवर

केसं आपल्या शरीराच्या वरच्या भागात असल्याने यातूनही सुगंध वाहण्यास मदत होते. आपल्या आवडता पर्फ्यूम केसांमध्ये सोडल्यास उशीरापर्यंत दूरवर सुगंध दरवळत राहतो. 

कानाच्या मागे

कानाच्यामागील भागातील नसं या स्किनच्या जवळ असतात आणि सुंगध पसरवण्यास सोयीस्कर ठरतात. 

कोपर

कोपरच्या जवळ तुम्ही घामाचे थेंब पाहिलेयत का ? शरिराच्या या भागातून गर्मीमुळे जास्त घाम निघतो. हीच गरमी आपल्या पर्फ्यूमचा सुगंध असरदार बनवते. 

गुडघ्यामागे

कोपरप्रमाणे गुडघ्याच्यामागच्या भागातही खूप घाम निघतो आणि इथे पर्फ्यूम लावल्याने खूप सुगंध येतो. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close