मुलींमधील हे ७ गुण त्या कधीच सर्वांसमोर दाखवत नाहीत!

मुलींना समजून घेणे म्हणजे दिव्यच.

Updated: Apr 28, 2018, 06:24 AM IST
मुलींमधील हे ७ गुण त्या कधीच सर्वांसमोर दाखवत नाहीत!

मुंबई : मुलींना समजून घेणे म्हणजे दिव्यच. असे बोलले जाते. प्रत्येकीचा स्वभाव, गुण, अॅटिट्यूड वेगळा. पण तुम्हाला माहित आहे का? मुली कशाही असल्या तरी त्यांच्यात काही गुण दडलेले असतात. पण अनेकदा हे गुण त्या जगासमोर आणत नाहीत. तर अनेकदा त्यांना याची जाणीवच नसते. पाहुया असे कोणते गुण आहेत जे प्रत्येक मुलीत असूनही ती ते दाखवत नाही... तुम्हीही पहा कमी अधिक प्रमाणात हे गुण तुमच्यात असतील...

#1. जगातील प्रत्येक मुलीमध्ये रोमांस भरलेला असतो. पण अधिकतर मुली स्वतःला अनरोमांटिक असल्याचे भासवतात. कारण त्यांना त्यांची सभ्य आणि लाजाळू इमेज जपायची असते.

#2. मुलींकडे पैसे वाचवण्याचा खास गुण असतो. शॉपिंग करण्यास खूप आवडत असले तरी त्यांच्याकडे सेव्हिंगचे खास फंडे असतात.

#3. मुलींना पार्टी करायला आणि रात्री बाहेर फिरायला आवडत असते. मात्र तशी संधी त्यांना फारशी कधी लाभत नाही तर अनेकदा कौटुंबिक दबावामुळे त्यांना पार्ट्यांना जाता येत नाही.

#4. प्रत्येक मुलगीमध्ये हिंमत असते. पण त्याची जाणीव अनेकदा त्यांनाच नसते. पण तिच्यात खंबीरपणा असतो.

#5. प्रत्येक मुलीत ममता असते. लहान मुले बघितल्यावर त्यांचे मन हेलावून जाते. मात्र अनेकदा मुली तसे उघडपणे दाखवत नाहीत.

#6. मुली स्वतःची कामे स्वतः करु शकतात. त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास असतो. पण जगासमोर त्या तसे दाखवत नाहीत. कारण अशा मुलींना लोक साधी सिंपल समजतात.

#7. मुलींनाही तारीफ करता येते. पण त्या अनेकदा करत नाहीत. कारण त्यांना भाव खायचा असतो आणि स्वतःला कोठेही कमी समजायचे नसते.