ब्लू व्हेल गेममुळे आणखी २ तरुणींची आत्महत्या, व्हिडिओ व्हायरल

ब्लूव्हेल गेममुळे आणखी २ तरुणींनी इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे.

Updated: Aug 18, 2017, 02:27 PM IST

नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे. ब्लूव्हेल गेममुळे आणखी २ तरुणींनी इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. या जीवघेण्या गेमने आतापर्यंत अनेकांचा जीव घेतला आहे. 

या गेमची शेवटची स्टेज ही आत्महत्या करण्याची आहे. यामध्येच २ तरुणींनी आपला जीव दिला आहे. २ तरुणींनी ७ व्या माळ्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अजून समोर आलेलं नाही.

भारतात देखील व्हायरल झालेल्या जीवघेण्या या ब्लू व्हेल गेममुळे अनेक मुलांनी आत्महत्या केली आहे. यानंतर आता सरकारने सर्व सोशल साईटवरुन या गेमच्या लिंक हटवण्याचे देखील आदेश दिले आहेत.