आता नवाझ शरीफ यांनाच सुरक्षेची गरज - उज्ज्वल निकम

नवाज शरीफ यांनी हे वक्तव्य केल्याने त्यांनी पाकिस्तानचं पितळ उघडं पाडलंय त्यामुळे तिथलं लष्कर आणि आयएसआय हे नवाज शरीफ यांना याबाबत जाब विचारतील,असंही निकम म्हणाले.

Updated: May 12, 2018, 11:55 PM IST

मुंबई : २६/११ च्या हल्ल्यासाठी पाकिस्तानातून अतिरेकी पाठविले गेले होते असं वक्तव्य केलेल्या पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची सुरक्षा वाढवावी लागेल. तसंच हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडावा लागेल अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिलीय. नवाज शरीफ यांनी हे वक्तव्य केल्याने त्यांनी पाकिस्तानचं पितळ उघडं पाडलंय त्यामुळे तिथलं लष्कर आणि आयएसआय हे नवाज शरीफ यांना याबाबत जाब विचारतील,असंही निकम म्हणाले.

शरीफ यांचा खुलासा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मुंबई हल्ल्यावर मोठा खुलासा केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, २००८ मध्ये मुंबईमध्ये झालेल्य़ा दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता. याआधी भारताच्या या दाव्यावर पाकिस्तानच्या सरकारने नकार दिला होता. पण आता नवाज शरीफ यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानने आतापर्यंत मुंबई हल्ल्यात पाकिस्तानची भूमिका असल्याची गोष्ट नाकारली आहे.

नवाज शरीफ यांनी म्हटलं की, 'पाकिस्तानमध्ये ती सरकारं चालत आहेत. यावेळी पाकिस्तानमध्ये अनेक दहशवादी संघटना सक्रीय आहेत. पाकिस्तामधील वृत्तपत्र डॉनला दिलेल्या एका मुलाखतीत नवाज शरीफ यांनी म्हटलं की, 'ज्या दहशवादी संघटना सक्रिय आहेत काय त्यांना आपण सीमेपलीकडे आणि मुंबईमध्ये १५० लोकांची हत्या करण्याची परवानगी दिली पाहिजे' रावळपिंडी दहशतवादी विरोधी न्यायालयाताली मुंबई हल्ल्यातील ट्रायल लांबत असतांना त्यावर बोलताना नवाज शरीफ यांनी म्हटलं की 'आपण सुनावणी पूर्ण का केली नाही' 

नवाज शरीफ यांना पनामा पेपर प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मागील वर्षी २८ जुलैला दोषी ठरवलं होतं. यानंतर त्यांना पंतप्रधानपद सोडावं लागलं होतं.