अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बुश यांचं निधन

 पत्नी बारबरा यांच्या मृत्यूनंतर एका आठवड्यातच तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. 

Updated: Dec 1, 2018, 11:49 AM IST
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बुश यांचं निधन  title=

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश यांचं शुक्रवारी वयाच्या 94  व्या वर्षी निधन झालं. त्यांचा जन्म 12 जून 1924 रोजी झाला. 1989 ते 1993 पर्यंत ते अमेरिकेचे 41 वे राष्ट्राध्यक्ष राहिले. राष्ट्राध्यक्ष पद भूषविण्याआधी ते 1981 ते 1989 पर्यंत ते अमेरिकेचे 43 वे अध्यक्ष होते. याच वर्षात 17 एप्रिलला त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. पत्नी बारबरा यांच्या मृत्यूनंतर एका आठवड्यातच तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं.

महत्त्वाची भूमिका 

Image result for george-herbert-walker-bush zee

शीत युद्धाच्या अखेरीपर्यंत अमेरिकेला चालवण्यात बुश यांची महत्त्वाची भूमिका होती.

आम्हाला सांगण्यास दु:ख होतंय की, वयाच्या 94 व्या वर्षी आमच्या ( जेब, नील, मार्विन, डोरो) वडिलांचा मृत्यू झाल्याचे ट्विट करण्यात आलंय. बुश यांच्या पाश्चात 5 मुलं आणि 17 नातवंड आहेत.

आपल्या अखेरच्या दिवसात ते व्हिल चेयरवर असत. त्यांच्या मृत्यू मागच कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलं नाहीय.