अमेरिका-उत्तर कोरियामधला तणाव वाढला!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.

Darshana Pawar | Updated: Oct 12, 2017, 11:09 PM IST
अमेरिका-उत्तर कोरियामधला तणाव वाढला!

वाशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. जेव्हा उत्तर कोरियाचा विषय येतो, तेव्हा माझा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो, असं सूचक वक्तव्य ट्रम्प यांनी केलंय. व्हाइट हाऊसमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदेऊ यांच्यासोबतच्या भेटीत त्यांनी हे वक्तव्य केलं.

मी सर्वांचं ऐकतो... पण उत्तर कोरियाबाबत माझा दृष्टीकोन इतरांपेक्षा थोडा वेगळा आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. उत्तर कोरियानं अण्वस्त्र चाचण्या केल्यानंतर, गेल्या काही आठवड्यात उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनलेत. आपल्याकडं हायड्रोजन बॉम्ब असल्याचा दावा उत्तर कोरियानं केला आहे.