'हा' मुलगा १८० अंशात फिरवतो मान!

आजकाल सोशल मीडियामुळे अनेक कला, एखाद्यामध्ये असलेले कौशल्य, गुण, वेगळेपण पटकन समोर येते.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 10, 2017, 04:09 PM IST
'हा' मुलगा १८० अंशात फिरवतो मान!

मुंबई : आजकाल सोशल मीडियामुळे अनेक कला, एखाद्यामध्ये असलेले कौशल्य, गुण, वेगळेपण पटकन समोर येते. कारण ते फोटो, व्हिडीओज सोशल मीडियावर चटकन व्हायरल होतात. आता अशाच एका अवलिया मुलाला भेटूया, जो आपली मान १८० अंशात फिरवतो.हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण खरंच हा मुलगा आपल्या शारीरिक लवचिकतेचा वापर करून घुबडासारखी मान फिरवतो. त्याचबरोबर हात-पाय देखील फिरवू शकतो. 

मोहम्मद समीर असं या मुलाचं नाव असून तो फक्त १४ वर्षांचा आहे. त्याची शारीरिक लवचिकता जबरदस्त असल्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. त्याच्या याच कामगिरीमुळे सोशल मीडियावर त्याला ‘ह्युमन आऊल’ असं म्हटलं जातं. 

हा अवलिया काराचीच असून तो एका डान्स ग्रुपचा भाग आहे. मोहम्मदचे वडील सतत आजारी असल्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी त्याच्यावर आहे. आपली कला सादर करून तो पैसे कमवतो आणि आपले कुटुंब चालवतो. 

हॉलिवूडच्या भयपटांमध्ये पाहिलेल्या भुतांप्रमाणे मान वळवण्याचं खूळ त्याच्या डोक्यात होतं. आईच्या विरोधाला न जुमानता त्याने वयाच्या सहाव्या वर्षांपासून मान वळवण्याचा सराव केला. मात्र त्याचमुळे तो आता लोकांचे मनोरंजन करतो आणि कुटुंबाचे पोट देखील भरतो.