ट्रॅफिकचे नियम तोडले, पोलिसांना बघून 'तो' नाचायला लागला

 आतील चालक कारबाहेर आला आणि डान्स करायला लागला.

Updated: Nov 20, 2017, 06:05 PM IST
ट्रॅफिकचे नियम तोडले, पोलिसांना बघून 'तो' नाचायला लागला  title=

हॉस्टन : पोलिसांना बघूनच भल्याभल्यां चोरांची भांबेरी उडते. अपराध करणाऱ्या प्रत्येकाला पोलिसांची भिती वाटतेच. पण एक अपराध केलेला एक तरुण पोलिसांना पाहून चक्क डान्स करायला लागला. अमेरीकेतील टेक्सस या शहरात ही घटना घडली. 

कारचा पाठलाग

ह्यूस्टन शहरात रात्री १२ वाजता पोलीस एका कारचा पाठलाग करत होते. या कारने ट्रॅफिकचे नियम तोडल्याने पोलीस या चालकाला अद्दल घडविण्याच्या तयारीत होते. 

कार बाहेर येऊन डान्स

पण घडत असलेला प्रकार पोलिसांनाही अचंबित करणारा होता.  साधारण २० मैल पाठलाग केल्यानंतर ती कार मध्येच थांबली. आतील चालक कारबाहेर आला आणि डान्स करायला लागला. त्या बेड्या ठाकून घेण्यास मनाई केली. काही वेळ त्याचा डांस पाहिल्यानंतर काबूत करण्यासाठी 'पोलिसी हत्यार' बाहेर काढावे लागले.

पोलीस तपास 

आरोपीची अजूनही ओळख पटली नसली तरी तो पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याने ड्रग्ज,दारूचे सेवन केले आहे का ? याचा पोलीस तपास करीत आहेत.