पाकिस्तानात बस दरीत कोसळून २७ ठार

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात २७ जण ठार झालेत. तर अन्य ६९ जण जखमी झालेत. 

Updated: Nov 9, 2017, 11:28 PM IST

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात २७ जण ठार झालेत. तर अन्य ६९ जण जखमी झालेत. 

या बसमधून १००हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. ही बस कोहाट येथून रायविंडच्या दिशेने जात होते. 

बुधवारी रात्रीच्या सुमारास कल्लर कहार नगर येथे ही दुर्घटना घडली. प्रवासी दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या धार्मिक संमेलनात सहभागी होण्यासाठी रायविंडला जात होते. यावेळी हा अपघात घडला. 

हा अपघात कसा घडला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. दरम्यान बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जातेय. 

पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला असून याप्रकरणी रिपोर्ट मागितला आहे.