मार्क झुकरबर्गचा जन्म चंद्रग्रहणात

आज जगभरात चंद्राचं अनोख रुप पाहायला मिळणार आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 31, 2018, 07:57 PM IST
 मार्क झुकरबर्गचा जन्म चंद्रग्रहणात  title=

मुंबई : आज जगभरात चंद्राचं अनोख रुप पाहायला मिळणार आहे. 

हे चंद्राचं रूप जवळपास 150 वर्षानंतर दिसणार आहे. चंद्रग्रहण ही खगोलशास्त्रातील घटना आहे. मात्र चंद्रग्रहण शुभ- अशुभ, चांगल - वाईट अशी चर्चा आहे. काही लोकांचा यावर विश्वास देखील आहे. देशाची राजधानी दिल्लीत हे चंद्रग्रहण संध्याकाळी 5.58 वाजता दिसला. 

चंद्रग्रहणाच्या दिवशी कोणत्याही शुभ गोष्टी करू नयेत. तसेच अनेकजण सांगतात की, गर्भवती महिलांनी या काळात अन्न खावू नये. तसेच असं देखील म्हटलं जातं की, चंद्रग्रहण असेल तेव्हा जेवू नये, पाणी पिऊ नये तसेच प्रवास देखील टाळावा. एवढंच नव्हे तर ग्रहणात जन्मलेल बाळं हे अशुभ मानलं जातं. मात्र जगाला फेसबुक सारख्या क्रांतिकारी घटना घडली आणि सोशल मीडिया नावाचं नवं टूल निर्माण झालं. मार्क झुकरबर्ग हा फेसबुकचा संस्थापक ग्रहण काळात जन्मला आहे. आता ही तुमचा विश्वास आहे का की, ग्रहणात जन्माला आलेलं बाळं हे अशुभ आहे. 

यूगोस्लोविकियाचा राजा पीटर. याचा जन्म 6 डिसेंबर 1923 ला सर्बियाच्या सूर्यग्रहणाच्या अगोदर झाला. तिथेच इटलीचा राजा विक्टर इम्यूनलचा जन्म 14 मार्च 1820 रोजी सूर्य ग्रहणात झाला. मात्र यापेक्षा अधिक जवळचं उदाहरण आहे मार्कचं फेसबुकचा सीईओ मार्क इलियट झुकरबर्ग याचा जन्म चंद्रग्रहणात झाला आहे. 

मार्क झुकरबर्ग याचा जन्म 14 मे 1984 रोजी झाला. या दिवशी त्यावेळी चंद्रग्रहण होता. मार्कने फेसबुकची सुरूवात 4 फेब्रुवारी 2004 रोजी  हारवर्ड युनिर्व्हसिटीच्या आपल्या डोरमेटरी रूममधून केली होती. डिसेंबर 2016 मध्ये फोर्ब्सने मार्क झुकरबर्गला जगातील 10 सर्वात ताकदीचा यादीत समाविष्ट केलं.